जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मतदारसंघात मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 35 हजार नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे व्हिजन कॅटॅलिस्ट फंड, जतन फाऊंडेशन, रिस्टोरिंग व्हिजन, एस्सीलोर व बारामती ॲग्रो, या संस्थांचे सहकार्य मिळाले. नेत्र तपासणी शिबिरादरम्यान एकूण ३५ हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण २० हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.