Anil Ramod : वढू बुद्रूक येथील जमीन प्रकरणात सीबीआयची एन्ट्री, लाचखोर डाॅ. अनिल रामोड यांच्या अडचणीत वाढ?

पुणे : वादग्रस्त अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ अनिल रामोड (Anil Ramod) यांनी आपल्या कार्यकाळात हाताळलेल्या वादग्रस्त महसुली प्रकरणांची सीबीआयने सखोल चौकशी सुरू केली. अश्याच एका प्रकरणात अनिल रामोड यांनी दिलेले आदेश आणि त्यासंबंधीच्या फाईल्स शिरूर तहसीलदार (Shirur Tehsildar) यांच्याकडून CBI ने मागवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनिल रामोड यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (CBI entry in Vadhu Budruk Class 2 land case, IAS Dr Anil Ramod’s Increase in problem?, Anil Ramod latest News today)

CBI entry in Vadhu Budruk Class 2 land case, IAS Dr Anil Ramod's Increase in problem?, Anil Ramod latest News today,

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) भूसंपादनाच्या एका प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ अनिल रामोड यांना 8 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात सीबीआयने रंगेहाथ पकडण्याची कारवाई केली होती. त्यानंतर रामोड यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी छापेमारी केली.त्यात 6 कोटी 64 लाख रूपये आणि स्थावर मालमत्तांचे कागदपत्रे जप्त करण्यात आले होते. तीन दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने रामोड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Anil Ramod in 14 days judicial custody) सुनावली आहे.

अनिल रामोड यांनी आतापर्यंत भूसंपादनाचे जे निकाल दिले आहेत त्या सर्व निकालांची  चौकशी सुरू केली आहे. त्याच बरोबर वढू बुद्रूक येथील देवस्थान जमिनी प्रकरणाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली.त्या अनुषंगाने सीबीआयने शिरूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवून संबंधित जमिनीच्या फाईल्सची माहिती मागविल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. (CBI entry in Vadhu Budruk Class 2 land case, IAS Dr Anil Ramod’s Increase in problem?, Anil Ramod latest News today,)

वढू बुद्रूक येथील जमीन प्रकरण नेमकं काय आहे?

वढू बुद्रूक येथे वक्फ मंडळाची १९ एकर जागा (वर्ग २) देवस्थानची ईनामी जमीन आहे. ही जमीन १८६२ च्या सनद प्रमाणे असताना विभागीय अतिरीक्त आयुक्त अनिल रामोड यांनी खासगी लोकांच्या नावे करून दिल्याचा आरोप करत निकालाची कागदपत्रे वक्फ बोर्डाने जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना विभागीय आयुक्तांनी पदाचा गैरवापर करत सातबारा उताऱ्यावर खासगी लोकांची नावे टाकण्याचे आदेश दिले, या जमिनीचा व्यवहार करण्यात आला असा आरोप वक्फ बोर्डाने केला आहे. या प्रकरणात डाॅ. अनिल रामोड यांच्यासह 19 जणांना कारणे दाखवा नोटीस वक्फ बोर्डाने बजावली आहे.यासंदर्भात खुलासा करण्यासाठी चार आठवड्याची मुदत दिली होती.परंतु ही मुदत संपण्यापूर्वीच डाॅ.अनिल रामोड लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकले. (CBI entry in Vadhu Budruk Class 2 land case, IAS Dr Anil Ramod’s Increase in problem?, Anil Ramod latest News today,)

वढू बुद्रूक जमीन प्रकरणात सीबीआयची एन्ट्री

दरम्यान, भूसंपादन प्रकरणांची सीबीआयने सखोल चौकशी सुरु असतानाच सीबीआयच्या हाती वढू बुद्रूक येथील 19 एकर वर्ग दोनच्या जमीन प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाच्या सर्व फायली आणि आदेश मागवले आहेत. या प्रकरणाचा सीबीआयने सखोल तपास सुरू केला आहे. त्यामुळे अनिल रामोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.