Anil Ramod : अनिल रामोड 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत, जामीनासाठी रामोड यांच्या वकिलांची सीबीआय न्यायालयात धाव, जामीनावर होणार आज फैसला
पुणे : सीबीआयच्या अटकेत असलेले लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ.अनिल रामोड (IAS Anil Ramod) यांना न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृह (Yerawada Central Jail) रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर रामोड यांनी आपल्या वकिलामार्फत सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Anil Ramod’s Advocate Application for bail in CBI court)
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) भूसंपादन प्रकरणांसाठी नेमलेल्या लवादाच्या एका प्रकरणात आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अतिरीक्त विभागीय आयुक्त डाॅ. अनिल रामोड यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर सीबीआयने विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे 6 कोटी 74 लाखाची रोकड आणि स्थावर मालमत्तांची जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजल करण्यात आले होते. न्यायालने त्यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.(Anil Ramod Latest News)
डाॅ. अनिल रामोड यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (14 days judicial custody) सुनावल्यानंतर डाॅ. अनिल रामोड यांनी आपल्या वकिलामार्फत सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामध्येच डाॅ. रामोड यांना जामिन मिळतो की त्यांचा येरवडा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढतो हे स्पष्ट होणार आहे. (Anil Ramod news)
अनिल रामोड प्रकरणाचा थोडक्यात आढावा
- डाॅ अनिल रामोड हे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत.
- डाॅ अनिल रामोड हे पुणे महसुल विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत आहेत.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादन प्रकरणात 8 लाख रूपयांची लाच घेताना अनिल रामोड यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले
- सीबीआयने अनिल रामोड यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी छापेमारी केली, त्यात सात कोटीच्या आसपास रोकड आणि स्थावर मालमत्तांचे कागदपत्रे सीबीआयने जप्त केले
- सीबीआयने अनिल रामोड यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली
- तीन दिवसानंतर अनिल रामोड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
- अनिल रामोड यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी
- जामीनासाठी अनिल रामोड यांची वकिलामार्फत सीबीआय न्यायालयात धाव
- अनिल रामोड यांच्या जामीनावर आज फैसला