Bhaskar More News : अखेर रत्नदीप मेडिकल कॉलेजवर सर्वात मोठी कारवाई, विद्यापीठाच्या तीन सदस्यीय सत्यशोधन समितीची कारवाई !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरे (Bhaskar More Jamkhed) यांच्या विरोधात हाती घेतलेल्या आक्रमक अंदोलनाची धग चौथ्या दिवशीही कायम होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन सदस्यीय सत्यशोधन समितीने अंदोलक विद्यार्थ्यांशी (Student movement) शुक्रवारी संवाद साधला.यावेळी या पथकाने विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या जाणून घेतल्या.त्यानंतर या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रत्नदीप मेडिकल कॉलेजवर (Ratnadeep medical college Jamkhed) सर्वात मोठी कारवाई केली आहे. यावेळी या पथकाने रत्नदीप शैक्षणिक संकुलातील ६ लॅब सील करण्याची मोठी कारवाई केली आहे. (Bhaskar More News)

Big Breaking, Finally, biggest action against Ratnadeep Medical College, action of savitribai fule pune  action of three-member truth-seeking committee of pune university, Bhaskar more jamkhed news today ,

विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या अंदोलनामुळे गेल्या चार दिवसांपासून जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल कॉलेज प्रकाशझोतात आले आहे.रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील शेकडो विद्यार्थ्यांनी रत्नदीपचे संस्थापक डाॅ भास्कर मोरेंविरोधात (Dr Bhaskar More Patil) आक्रमक अंदोलन हाती घेतले आहे.डाॅक्टर मोरे यांचा मनमानी कारभार विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणला. विद्यार्थ्यांनी मोरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याने भास्कर मोरे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. (Bhaskar more news)

डाॅ भास्कर मोरे यांच्यावर मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.मोरे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जामखेडला येऊन आमच्या व्यथा ऐकाव्यात आणि काॅलेजवर कठोर कारवाई करावी,अशी अंदोलक विद्यार्थ्यांची मागणी होती.अंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी डाॅ भास्कर मोरेंविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका विद्यार्थिनीने फिर्याद दाखल केली आहे.रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनींकडून डाॅ मोरे यांच्याविरोधात अश्या प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. (Bhaskar More latest news)

दरम्यान, शुक्रवारी अंदोलनाच्या चौथ्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन सदस्यीय सत्यशोधन पथकाने जामखेडला भेट दिली. रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील अंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्थापकाविरोधात गंभीर आरोप केले. त्यानंतर या पथकाने रत्नदीप शैक्षणिक संकुलातील ६ लॅब सील करण्याची मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई विद्यापीठाच्या डाॅ संदिप पालवे, जी वाय दामा, डाॅ अमोल घोलप या तीन सदस्यीय सत्यशोधन समितीने केली. यावेळी तहसीलदार गणेश माळी, पोलिस निरीक्षक महेश पाटील, नायब तहसीलदार महेश अनारसे, तसेच अंदोलक विद्यार्थी उपस्थित होते. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. (Bhaskar More news today)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय सत्यशोधन समितीने शुक्रवारी जामखेडला भेट दिली. जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये नेमके काय सुरु आहे यावर त्यांनी अनेकांकडून माहिती जाणून घेतली.सत्यशोधन समितीने अंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थी, गावकरी आणि विविध संघटनांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर या पथकाने तहसीलदार गणेश माळी, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना सोबत घेत रत्नदीप शैक्षणिक संकुलास भेट दिली.(Bhaskar More jamkhed news)

या ठिकाणी या पथकाला अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. काही कागदपत्रांची मागणी केली ती काॅलेजने पथकाला दिले नाही. संस्थेच्या सचिव पथकाला भेटायला आल्या. सुरुवातीला त्यांनी पथकाला सहकार्य केले नाही. परंतू काही वेळाने त्यांनी पथकाला सहकार्य केले.त्यानंतर सत्यशोधन पथकाने संपुर्ण काॅलेजची पाहणी केली. यावेळी या पथकाला लॅबमध्ये अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या. यामध्ये पुर्णपणे डेट झालेले मटेरियल आढळून आले. मेडिकल काॅलेजचे मटेरियल फार्मसी काॅलेजमध्ये आढळून आले. अश्या अनेक धक्कादायक गोष्टी या पथकाच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर पथकाने पंचनामा करत सहा लॅब सील करण्याची मोठी कारवाई केली आहे. (Bhaskar More news)

सत्यशोधन समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आजच्या चौकशीचा आणि कारवाईचा प्राथमिक अहवाल तातडीने सोपवणार आहे.आम्ही दुसरा अहवाल सादर करताना अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टींचा समावेश करणार आहोत, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दुर केला जाणार आहे अशी माहिती सत्यशोधन समितीचे अध्यक्ष डाॅ संदिप पालवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Bhaskar More News)

रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या आक्रमक अंदोलनास चौथ्या दिवशी मोठे यश मिळाले. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याबरोबरच आता मेडिकल काॅलेजमधील लॅब सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाचे तीन सदस्यीय पथक विद्यापीठाला काय अहवाल सादर करणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले. रत्नदीप मेडिकल काॅलेजवर विद्यापीठ कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Bhaskar More News)

जामखेडच्या रत्नापुर येथील रत्नदीप मेडिकल काॅलेजमध्ये राज्यभरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या काॅलेजचे संस्थापक डाॅ भास्कर मोरे यांच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती. रत्नदीप संस्थेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी भव्य मोर्चा काढला होता.यावेळी विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरेंच्या मनमानी कारभाराचा बुरखा प्रशासनासमोर टराटरा फाडला.मोरे यांच्याकडून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. (Bhaskar More News)

जोवर डाॅ भास्कर मोरेंवर गुन्हा दाखल होत नाही तोवर अंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून रत्नदीपच्या विद्यार्थ्यांचे जामखेडमध्ये आक्रमक अंदोलन सुरु होते. या अंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे डाॅ भास्कर मोरेंवर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव वाढला होता. अखेर डाॅ मोरेंविरोधात 7 मार्च 2024 रोजी रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका पीडित विद्यार्थीनीने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डाॅ भास्कर मोरे यांच्याविरूध्द IPC- 354, 354 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhaskar More News)

फिर्यादीत म्हटले आहे की,20 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक भास्कर मोरे पाटील यांनी फिर्यादी तरूणीस कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले होते. या ऑफिसमधील अँटी चेंबर मध्ये फिर्यादी तरूणीला घेऊन जात तिच्याशी अश्लिल चाळे केले होते. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. त्यानुसार पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून भास्कर मोरे विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी भास्कर मोरे विरोधात अश्याच स्वरूपाचा गुन्हा जामखेड पोलिस स्टेशनला दाखल आहे. या प्रकरणात मोरे हे अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत. (Bhaskar More News)

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात आयुर्वेद, होमिओपॅथी, फार्मसी आणि नर्सिंग महाविद्यालय चालवले जाते. या विद्यालयांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी संस्थाचालक भास्कर मोरेंविरोधात भव्य मोर्चा काढला होता. पोलिस स्टेशन समोर सहा तास ठिय्या दिला होता. दुसऱ्या दिवशीही आक्रमक अंदोलन केले होते. तिसऱ्या दिवशी या अंदोलनाची तीव्रता आणखीन वाढली होती. विद्यार्थ्यांनी खर्डा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला होता. (Bhaskar More News)

रत्नदिपच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या अंदोलनास विविध सामाजिक – राजकीय संघटनांचा पाठिंबा वाढला होता. गेल्या तीन दिवसांपासून जामखेड शहर डाॅ भास्कर मोरे यांच्याविरोधातील घोषणांनी दणाणून गेले होते. या अंदोलनात झळकावण्यात आलेले फलक डाॅ भास्कर मोरे यांची आब्रु वेशीवर टांगणारे ठरले.तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या अंदोलनाची जनमाणसांत जोरदार चर्चा रंगली होती. (Bhaskar More News)

दरम्यान, गुरुवारी प्रांताधिकारी नितिन पाटील व पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी जामखेडला भेट दिली. जामखेडमध्ये विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अंदोलनाची त्यांनी दखल घेतली. रत्नदीपच्या विद्यार्थीनींनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्याची (सहाय्यक पोलीस निरीक्षक) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्यांनी अंदोलक विद्यार्थ्यांना दिली. मात्र जोवर डाॅ भास्कर मोरेंवर गुन्हा दाखल होत नाही तोवर मागे हटणार नाही, असा निर्धार अंदोलक विद्यार्थ्यांनी केला होता. (Bhaskar More News)

रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले अंदोलन अधिक तीव्र बनल्याने अखेर गुरुवारी रात्री उशिरा एका पीडित विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून डाॅ भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या अंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. (Bhaskar More News)

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून अंदोलन करत असलेल्या रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना जामखेड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक मुला मुलींना अशक्तपणा आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तहान भूक विसरून विद्यार्थी आक्रमकपणे डाॅ मोरेंविरोधात अंदोलन करताना दिसत आहेत. (Bhaskar More News)

रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या उपोषणाच्या अंदोलनास जामखेड तालुका वकिल संघाने पाठिंबा दिला आहे. रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील मुली सुरक्षित नसल्याचे सध्या सुरू असलेल्या अंदोलनावरून स्पष्ट होत असून रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी तातडीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी. सदर प्रकरणाची महिला आयोगाकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी जामखेड तालुका वकिल संघाने केली. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आरपीआय, प्रहार, मनसे, आम आदमी पार्टी, सह आदींनी या अंदोलनास सक्रीय पाठिंबा दिला आहे. (Bhaskar More News)

shital collection jamkhed