जामखेड : रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात विद्यार्थी का झाले आक्रमक? त्यांच्या मागण्या काय आहेत? प्रशासनासमोर विद्यार्थ्यांनी काय मांडली भूमिका ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी रत्नदीपचे संस्थापक डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. डाॅ भास्कर मोरे यांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी मंगळवारी रस्त्यावर उतरले होते.त्यांनी भव्य मोर्चा काढला.पोलिस स्टेशन समोर सहा तास ठिय्या आंदोलन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या संस्थापक डाॅ भास्कर मोरे यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच तहसील व पोलिस प्रशासनासमोर वाचला.या अंदोलनामुळे जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
जामखेड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर रत्नापुर येथे डाॅ भास्कर मोरे यांचे रत्नदीप मेडिकल काॅलेज आहे. या ठिकाणी राज्यभरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थाचालक डाॅ भास्कर मोरे यांच्या कारभाराविरोधात संस्थेतील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी 250 ते 300 विद्यार्थ्यांनी काॅलेज ते जामखेड तहसील कार्यालय असा 3 किलोमीटर मोर्चा काढला होता. या मोर्चाने संपुर्ण जामखेड शहरवासियांचे लक्ष वेधले.
यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी रत्नदीपचे संस्थापक डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे तहसील व पोलिस स्टेशनचा परिसर दणाणून गेला होता. विद्यार्थ्यांच्या या अंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती.विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरे यांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेची चर्चा आता जिल्हाभर पसरली आहे.
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात केले आहेत. यावेळी दिलेल्या निवेदनात विद्यार्थांनी डाॅ मोरे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी सहा तास ठिय्या अंदोलन केले. प्रशासनाने विद्यार्थ्यांची समजुत काढल्यानंतर हे अंदोलन मागे घेण्यात आले.
आज बुधवारी रत्नदीपचे विद्यार्थी तहसील आवारात जमले आहेत. रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या संस्थापकाविरोधात मोठी कारवाई होणार की विद्यार्थ्यांचे हे अंदोलन पेल्यातील वादळ ठरणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रत्नदीप मधील विद्यार्थ्यांच्या या आहेत शैक्षणिक मागण्या ?
1) exam form वर जितकी fees नमूद आहे तेवढीच यावी, Fees विद्यार्थ्यांकडूनआकारण्यात यावी 2) Backlog ची extra fees आकारू नये 3) Attendence ही Hall ticket येई पर्यंतची Calculate करावी 4) Bus fees km प्रमाणे आकारण्यात यावी Bus साठी कोणतेही बंधन नसावे 5) स्नेह संमेलनची वर्गणी (3 हजार) घेऊ नये 6) Industrial visit one day rectum पाहिजे. (As possible near to college) 7) Journal आणि uniform fees योग्य दरात आकारण्यात यावी 8) development fees, (ST, डी परत करण्यात यावी. Category 1,000) 9) sessional exam Reschedual करण्यात यावी व time table officially 4 days आधी सांगण्यात यावा 10) विद्यार्थीनींना विनाकारण college campus थांबुन ठेवू नये.
11) वेळेवर lecture & a practical घेण्यात यावी. तसेच classes separate करावेत 12) Internal Marks हे sessional च्या mean वरुन दयावेत 13) जमा केलेल्या सर्व fees ची receipt देण्यात यावी 14) college चे problem solve करण्यसाठी principal असावे, अध्यक्ष नाही. 15) document return करताना योग्य ते शुल्क घेण्यात यावे 16) विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक पिळवणुक करु नये 17) Batu university ची जेवढी official fees आहेत तेवढीच घेण्यात यावी 18) university चे सर्व परिपत्रक विद्यार्थीना दाखवावेत किंवा notice board वर लावण्यात यावे 19) संस्थापक अध्यक्ष यांनी exam hall मध्ये कोणताही हस्तक्षेप करु नये.
रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांच्यावर विद्यार्थ्यांचे नेमके काय आरोप आहेत ?
रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांच्याकडून आम्हाला आजवर खुप छळण्यात येत आहे. तसेच ते मुलींची शारीरिक पिळवणूक व त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना शांत बसायला लावतात. सत्याची बाजू घेतल्यामुळे मानसिक त्रास देतात. स्व:ताच्या आयुष्यातील काही गोष्टींमुळे आम्हाला तीन तास कॉलेजमधून उशिरा सोडले जाते. कुठे काही सांगीतले तर तुम्हाला Internal marks देणार नाही व fail करण्यात येईल अशी धमकी ते आम्हाला सतत देतात, मुलींचे शोषण करतात, मुलींना कोणत्या ना कोणत्या कारणाने ब्लॅकमेल करतात.
जे विद्यार्थी डॉ मोरे यांच्या पुढे पुढे करतात त्यांना परीक्षेदरम्यान मोबाईल घेऊन बसवले जाते.मेंटली टॉर्चर करुन इंटरनल मार्क कमी देतात तसेच आमच्याकडुन कसलाही मजकुरलिहुन न घेता फक्त सही करु कोरे स्टॉप देखील घेतले जातात. तसेच मुलींचे पर्सनल मोबाईल चेक करुन त्या मध्ये काही आढळुन आले तर मुलींना टॉर्चर करुन ब्लॅकमेल देखील करतात, डॉ भास्कर मोरे हे प्राचार्यापेक्षा जास्त हस्तक्षेप करून विद्यार्थी व विद्यार्थिनींना मानसिक व शारीरिक त्रास देतात, विरोधात आवाज उठवला तर पेपरला बसु देणार नाही अशी धमकी देतात, असे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरे यांच्याविरोधात केले आहेत.
अंदोलनकारी विद्यार्थ्यांची भूमिका काय ?
जो पर्यंत रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष भास्कर मोरे यांना अटक होत नाही तो पर्यंत आम्ही कॉलेज सुरु होऊ देणार नाही आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी चे कुलगुरु जो पर्यंत कॉलेज ची पूर्ण चौकशी करत नाहीत तोपर्यंत आम्ही कॉलेज चालू होऊन देणार नाही, डाॅ भास्कर मोरे यांना अटक झाली नाही तर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी आक्रमक भूमिका रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी तहसीलदार गणेश माळी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनातून घेतली आहे.
डाॅ भास्कर मोरे यांची भूमिका काय ?
विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून 60 तर राज्य सरकारकडून 40 टक्के शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळत असते. यापूर्वी ही रक्कम सरकार संस्थेच्या खात्यात जमा करीत असे. आता केंद्र सरकार त्यांचा 60 टक्के हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करते. विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित रक्कम महाविद्यालयास पुढील सात दिवसांच्या आत जमा करावी असे शासकीय परिपत्रक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दहा दिवस उलटले तरी फी जमा केली नाही. त्यामुळे परीक्षा फॉर्म घेतले नाहीत. मात्र आता शासनाने याला मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी वेगळा विषय मांडून आंदोलन करत आहेत. काॅलेजस्तरावर विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतू अचानक बाहेरील काही मार्गदर्शकांचा हस्तक्षेप झाल्याने विद्यार्थ्यांनी अंदोलन करत आहेत, अशी प्रतिक्रिया रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांनी दिली आहे.