Bhaskar more : रत्नदीप प्रकरणी संभाजी ब्रिगेडची मोठी मागणी, उच्चस्तरीय चौकशी समिती काय कारवाई करणार ? याकडे लागले जामखेडकरांचे लक्ष !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शेकडो विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनाने राज्यात चर्चेत आलेल्या रत्नदीप प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे.रत्नदीप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणाऱ्या समितीकडे संभाजी ब्रिगेडने मोठी मागणी केली आहे.संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागणीवर चौकशी समिती काय कारवाई करणार ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Dr Bhaskar More latest news today)
जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थांनी संस्थाचालक डाॅ भास्कर मोरेकडून होत असलेल्या आर्थिक, मानसिक, व शारिरीक शोषणाविरोधात उठाव करत जामखेड तहसील कार्यालयाच्या आवारात 11 दिवसांचे आक्रमक अंदोलन केले होते. या अंदोलनास भेट देत आमदार प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने रत्नदीप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 15 सदस्य उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीचे कामकाज सुरु झाले आहे. (Bhaskar More news today)
रत्नदीप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या 15 सदस्यीय चौकशी समितीचे 19 रोजी बैठक पार पडली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी चौकशी समितीकडे निवेदनाद्वारे एक महत्वाची मागणी केली आहे. रत्नदीपच्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक लुटमारीस जबाबदार असणाऱ्या डाॅ मोरे सह रत्नदीपच्या संचालक मंडळाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सखोल तपास करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सावंत यांनी चौकशी समितीला निवेदन देत केली आहे. चौकशी समितीच्या वतीने प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी सावंत यांचे निवेदन स्विकारले. (Bhaskar More latest news today)
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्रा बैठकीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ रायगड यांच्या चौकशी कमिटी, जिल्हा पोलीप्रमुख यांचे प्रतिनिधी, जिल्हा वन प्रमुख, रत्नदीप मेडिकल कॉलेजचे सर्व कोर्स चे प्रत्येकी दोन विद्यार्थी, उपोषणकर्ते पांडुरंग भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ उपस्थित होते. (Bhaskar More jamkhed news today)
सर्व विद्यापीठांच्या चौकशी समित्यांनी रत्नदिपची एकाच वेळी चौकशी केल्यास यातील गौडबंगाल बाहेर येईल व सत्य सामोरं येईल अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी करताच जिल्हाधिकारी यांनी तात्काळ याची दखल घेऊन तीनही विद्यापीठांच्या चौकशी समित्यांना एकाच वेळी चौकशी करण्यासाठी जाण्याच्या सूचना दिल्या. (Bhaskar More news today)
संभाजी ब्रिगेडने चौकशी समितीला दिलेल्या निवेदनातून नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आहेत ?
प्रति,
मा. जिल्हाधिकारी अहमदनगर
तथा
अध्यक्ष चौकशी समिती
संदर्भ :- मा . एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशा नुसार जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या शारिरीक, अर्थिक, मानसीक पिळवणूकी संदर्भात चौकशी करण्या साठी दी १३/ ३/ २०२४ रोजी स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या आज दी १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील चौकशी बैठीकी सहभागी होत आहेत त्या संदर्भात.
विषय:- वरील संदर्भिय विषया नुसार आज आयोजीत चौकशी समितीच्या निमंत्रित चौकशी बैठकी मध्ये पुढीप्रमाणे विषय मांडण्यात येतं आहेत.
महोदय,
वरील विषयानुसार आपणास निवेदन करतो की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या आर्थिक, मानसीक व शारीरिक पिळवणूकीचा उद्रेक होऊन ५ मार्च ते १५ मार्च या कालावधीत जामखेड तहसील कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले, हे आंदोलन विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी स्वयंप्रेरणेने अन्याया विरोधात उठवलेला आवाज होता. हे सर्व विद्यार्थी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी जामखेड येथे आलेले आहेत व जामखेडचे संवेदनशील नागरीक म्हणून सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना , सर्वसामान्य जनता यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन अन्याया विरोधात आवाज उठवला होता.
तर या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणयासाठी कर्जत- जामखेड चे विधान सभा सदस्य मा. रोहीत पवार , माजी मंत्री तथा विद्यमान विधान परिषद सदस्य प्रा. राम शिंदे , पारनेर चे विधान सभा सदस्य मा . निलेश लंके यांनी महत्व पुर्ण योगदान दिले आहे . त्या अनुषंगाने आजच्या चौकशी समिती निमंत्रित चौकशी प्रक्रियेत सहभागी होत आहेत. आंदोलनात सहभागी होताना विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या कडून जाणून घेतलेल्या बाबी व प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता पुढील बाबींची चौकशी ‘समितीने ‘ करणे आवश्यक आहे.
१) वरील संदर्भीय विषया नुसार या कॉलेज मधील शिक्षण घेतं असलेल्या विद्यार्थीनीचे प्रात्यक्षिक परीक्षा गुण, कॉलेज कडे असलेली ओरिजनल कागदपत्र, कॉलेजने सह्या करुन घेतलेले कोरे स्टॅम्प पेपर, संस्था अध्यक्ष भास्कर मोरे यांच्या कडील शस्त्र परवाना असलेली बंदूक या माध्यमातून शारीरिक, अर्थिक व मानसिक पिळवणूक झाली आहे मात्र त्या अनुषंगाने चौकशी होऊन गुन्हे दाखल झालेले नाहीत तरी तशी करवाई व्हावी.
२) वरील सर्व पिळवणूकीस संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार असून देखिल त्यांचेवर कोणतीही करवाई झाली नाहीं ती व्हावी.
३) संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांनी मा. धर्मादाय आयुक्त यांचे कडे संस्था नोंदणी करतांना ज्या नियमांच्या अधीन राहून संस्थेचा कारभार करणे आवश्यक होते ते सर्व नियम पायदळी तुडवले आहेत व संस्थेच्या नावे बँक खाते उघडून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अर्थिक फसवणुक करून वयक्तिक अर्थिक लाभ घेतले आहेत तरी या अनुषंगाने चौकशी समिति मध्ये मा. धर्मादाय आयुक्त यांचा समावेश करून या संस्थेची चौकशी करून बँक खाते बंद करून या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची करवाई व्हावी.
४) यासंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळाची अर्थिक गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करावेत.
५) या कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यास संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे जबाबदार आहेत का ? या अनुषंगाने या घटनांचा सी आय डी कडून पुन्हा तपास कऱण्यात यावा.
६) या संस्थेचे अध्यक्ष भास्कर मोरे हे हरीण, मोर आदी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना डांबून ठेवणे अशी कृत्य करत असल्याची चर्चा व महिती आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.
७) या संस्थेला कॉलेज चालवण्याची मान्यता मिळाल्या पासून आज पर्यंत या कॉलेज मध्ये आवश्यक इमारत, शिक्षक, प्रयोग शाळा, ग्रंथालय, हॉस्पिटल, साधन सामुग्री उपलब्ध नसताना विद्यार्थ्यानं कडून नियमाने व नियम बाह्या मार्गाने अतिरिक्त फिस वसूल केली व त्याचा उपयोग योग्य शिक्षण व शिक्षण सुविधा देण्यासाठी केला नाही ही अर्थिक फसवणूक समजून चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत.
८) या संस्थे कडून व संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांच्या कडून होणारे मुलींचे शारीरिक शोषण व मानसिक छळ, विद्यार्थ्यांची अर्थिक फसवणुक व पिळवणूक , सर्व सरकारी संस्थांची, सरकारची व विद्यापीठांची फसवणूक लक्षात घेता येथे शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना इतर कॉलेज मध्ये शिक्षण उपलब्ध करून द्यावे व पुनः होणारे शोषण, छळ, फसवणुक व पिळवणूक टाळण्यासाठी ही संस्था व कॉलेज कायमस्वरूपी बंद करण्यासाठी व याची मान्यता रद्द करण्यासाठी आवश्यक ती करवाई करावी.
तरी वरील गंभीर बाबींचा चौकशी समितीने सखोल अभ्यास करून योग्य करवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती!
धन्यवाद!
आण्णासाहेब सावंत, प्रदेश उपाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य