जामखेड : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानेटकर यांच्याकडे रत्नदीपमधील BHMS चे विद्यार्थ्यी व पांडुरंग भोसले यांनी केली मोठी मागणी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रत्नदीपमधील BHMS च्या विद्यार्थ्यांनी व पांडुरंग भोसले यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानेटकर यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे.विद्यापीठात कुलगुरु व विद्यार्थ्यांची बैठक पार पडली.यावेळी या बैठकीत विद्यार्थ्यांनी रत्नदिपचा संस्थापक भास्कर मोरेच्या काळ्याकृत्याचा पाढा विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर वाचला. विद्यार्थ्यांनी कुलगुरु यांचे विविध महत्त्वपूर्ण गंभीर मुद्यांकडे लक्ष वेधले. रत्नदीपवर कठोर कारवाई होणारच असा निर्वाळा कुलगुरूंनी यावेळी पार पडलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना दिला, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले यांनी दिली आहे.
डाॅ भास्कर मोरे हा रत्नदीप शैक्षणिक संकुलाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची छळछावणी चालवत होता. त्याच्याकडून होत असलेल्या मानसिक,शारीरिक व आर्थिक अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी उठाव करत जनआंदोलन छेडले होते. विद्यार्थी, ग्रामस्थ, सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्ष,सामाजिक कार्यकर्ते यांनी सलग 11 दिवसांचे आंदोलनं केले होते. शिवप्रतिष्ठानचे पांडूराजे भोसले यांनी 10 दिवस आमरण उपोषण करत या अंदोलनास पाठिंबा दिला होता.हे अंदोलन राज्यभर गाजले होते.
या अंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दखल घ्यावी लागली होती.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीचा अहवाल समोर येणे बाकी आहे.
दरम्यान रत्नदीपमधील BHMS च्या विद्यार्थ्यांनी शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले यांच्यासमवेत 3 एप्रिल 2024 रोजी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ गाठत कुलगुरु माधुरी कानेटकर यांची भेट घेतली आणि डाॅ भास्कर मोरे याने विद्यार्थ्यांवर केलेल्या अन्याय अत्याचाराची कैफियत मांडली. भास्कर मोरे याने आर्थिक फायदा डोळ्यासमोर ठेवत BHMS च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत नापास केल्याचे समोर आले आहे. BHMS च्या निकालानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे.
भास्कर मोरे याने आर्थिक फायदा डोळ्यासमोर ठेवत BHMS च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत नापास करत विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेला हा अन्याय दुर करावा अशी मागणी रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरु माधुरी कानेटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 3 एप्रिल 2024 रोजी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीला विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानेटकर, रत्नदिपचे BHMS चे सर्व विद्यार्थी व शिवप्रतिष्ठानचे पांडूराजे भोसले उपस्थित होते.
यावेळी रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू माधुरी कानेटकर यांच्यासमोर भास्कर मोरेच्या छळछावणीचे वास्तव मांडले. पांडूराजे भोसले यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे विद्यापीठाची फसवणुक केल्याप्रकरणी भास्कर मोरे वर गून्हे दाखल करावेत अशी मागणी केली. तसेच रत्नदीपमधील सर्व विद्यार्थ्यांना इतर चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच रत्नदीप मेडिकल कॉलेजची मान्यता कायमस्वरूपी रद्द करून हे कॉलेज बंद करण्याची मागणी केली. याबाबतचे लेखी निवेदन कुलगुरु यांना देण्यात आले.
कुलगुरू माधुरी कानेटकर यांनी सर्वांच्या तक्रारी ऐकुन घेतल्या. सर्व विद्यार्थी लवकरच इतर चांगल्या कॉले मध्ये जातील व रत्नदिप कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येईल असे आश्वासन कुलगुरु यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले यांनी दिले.