जामखेड : तहसीलदार गणेश माळी यांच्या यशस्वी मधस्थीमुळे रत्नदीपच्या विद्यार्थ्यांचे अंदोलन स्थगित, रत्नदीप प्रकरणी तहसील कार्यालयात पार पडली बैठक, काय घडलं बैठकीत ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्यूकेशन बोर्डाच्या नोडल ऑफिसर जोत्स्ना बुधगावकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच इतर महत्वाच्या मागण्यांसाठी रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको अंदोलनाची हाक दिली होती. शनिवारी होणाऱ्या या अंदोलनापुर्वीच मोठ्या घडामोडी घडल्या.जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांनी रत्नदीपच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला.तहसीलदार गणेश माळी यांच्यामुळे रत्नदीपमधील विद्यार्थ्यांच्या अनेक महत्वाच्या मागण्या मार्गी लागल्या. तहसीलदार गणेश माळी यांनी यशस्वी मध्यस्थी केली.लेखी अश्वासन मिळताच रत्नदीपचे विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींनी रास्ता रोको अंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्यूकेशन बोर्डाच्या नोडल ऑफिसर जोत्स्ना बुधगावकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच इतर महत्वाच्या मागण्यांसाठी रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको अंदोलनाची हाक दिली होती. हे अंदोलन आज शनिवारी होणार होते. त्यापूर्वीच जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांनी तातडीच्या प्रशासकीय हालचाली केल्या. शनिवार जामखेड तहसील कार्यालयात रत्नदीपचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल मेडिकल एज्यूकेशन बोर्डाच्या संचालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत सहभागी घेतले. त्यानंतर झालेल्या चर्चेतून तोडगा निघाला. त्यामुळे रत्नदीपच्या विद्यार्थ्यांचे रास्ता रोको अंदोलन स्थगित करण्यात आले.

जामखेड तहसील कार्यालयातील बैठकीत काय घडलं ?

रत्नदीप प्रकरणी तहसीलदार गणेश माळी यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्यूकेशन बोर्डाचे संचालक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तसेच दूरध्वनीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व शिवप्रतिष्ठानचे पांडूराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या व आंदोलनाची भूमिका सविस्तर मांडली.

तसेच रत्नदीप नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्व अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. कॉलेजचे अध्यक्ष भास्कर मोरे आर्थिक हेतूने आमचे परीक्षा फॉर्म भरून घेत नाहीत, अर्थिक पिळवणूक करत आहेत. आम्ही यापुढे त्या कॉलेजमध्ये अजिबात पाऊल ठेवणार नाहीत आशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या समस्येवर तत्काळ उपाय करण्याची विनंती तहसीलदार गणेश माळी व ग्रामस्थांनी केली.

रत्नदीपच्या विद्यार्थ्यांची महत्वाची मागणी मान्य

यावेळी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्यूकेशन बोर्डाच्या संचालकांनी विद्यार्थी, ग्रामस्थ, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच प्रशासनाची भूमिका समजून घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना तात्काळ विशिष्ट e mail आय डी उपलब्ध करून देत  त्याद्वारे परीक्षा फॉर्म भरण्याची व्यवस्था करून दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या इतर सर्व अडचणी सोडविण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार गणेश माळी यांनी विद्यार्थ्यांना दिले.

जामखेड तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे महत्वाचे प्रश्न मार्गी लागले त्यामुळे नियोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या बैठकीत पोलिस निरीक्षक महेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले,मनसेचे प्रदिप टापरे, आरपीआयचे सुनिल साळवे, राष्ट्रवादीचे रमेश आजबे, प्रा. विकी घायतडक सह आदी ग्रामस्थ व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

तहसीलदार गणेश माळी यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे विद्यार्थ्यांना मिळतोय न्याय

रत्नदीप शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याकरिता तहसीलदार गणेश माळी यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. रत्नदीपच्या विद्यार्थ्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न तहसीलदार गणेश माळी यांनी मार्गी लावले.यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमधून त्यांचे आभार मानले जात आहेत.

संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत काय म्हणाले ?

महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल बोर्डाच्या वतीने नोडल अधिकारी सौ जोस्ना बुधगावकर या नर्सिंग कॉलेजचे काम पाहत होत्या, मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी रत्नदीप संस्थेला हाताशी धरुन विद्यार्थ्यांची पिळवणूक करत होत्या म्हणून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी घेऊन आम्ही रास्ता रोको आंदोलनाचा इशार दिला होता. तहसिलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बोर्डाच्या संचालकांशीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरून चर्चा घडवून आणली व सोमवारपर्यंत दुसरे नोडल अधिकारी नियुक्त करुन तसे पत्र देण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी दिली.