Bhaskar More News : डाॅ भास्कर मोरेंचा पाय आणखीन खोलात, विद्यापीठ सत्यशोधन समितीने रत्नदीपमधून अनेक महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतले, विद्यार्थीनींचा ‘तो’ आरोप खरा ठरला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Bhaskar More News : रत्नदिप शैक्षणिक संकुलातील गैरकारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या आक्रमक अंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने डाॅ भास्कर मोरेंविरोधात (Bhaskar More Jamkhed) कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. डाॅ भास्कर मोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा (Dr Bhaskar More crime news ) दाखल झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन पथकाने (Savitribai Phule Pune University Truth Investigation Team) रत्नदीप शैक्षणिक संकुलातून काही आक्षेपार्य कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Ratnadeep Medical Foundation and Research Center Ratnapur)

Dr. Bhaskar More's foot went deeper, many important documents were seized by University Truth Search Committee from Ratnadeep Medical Foundation and Research Center Ratnapur, student's 'allegation' was proved true.

रत्नदीपचे संस्थापक डाॅ भास्कर मोरे यांच्यावर मानसिक,आर्थिक आणि शारीरिक छळवणूकीचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. मोरे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे गेल्या चार दिवसांपासून अंदोलन सुरु आहे. अंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. अंदोलनाच्या चौथ्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने अंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांसह, सामाजिक – राजकीय संघटना आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील अंदोलक विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. (Bhaskar More News)

त्यानंतर विद्यापीठ सत्यशोधन समितीचे सदस्य डाॅ संदिप पालवे, जी वाय दामा, डाॅ अमोल घोलप, तहसीलदार गणेश माळी, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी शुक्रवारी रत्नदीप शैक्षणिक संकुलास भेट दिली. या ठिकाणी या पथकाला अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. काही कागदपत्रांची मागणी केली ती काॅलेजने पथकाला दिले नाही. संस्थेच्या सचिव पथकाला भेटायला आल्या. सुरुवातीला त्यांनी पथकाला सहकार्य केले नाही. परंतू काही वेळाने त्यांनी पथकाला सहकार्य केले.त्यानंतर सत्यशोधन पथकाने संपुर्ण काॅलेजची पाहणी केली. (Bhaskar More latest News)

काॅलेजची पाहणी करत असताना या पथकाला लॅबमध्ये संशयास्पद गोष्टी सापडल्या. यामध्ये पुर्णपणे डेट झालेले मटेरियल आढळून आले. मेडिकल काॅलेजचे मटेरियल फार्मसी काॅलेजमध्ये आढळून आले. अश्या अनेक धक्कादायक गोष्टी या पथकाच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर पथकाने पंचनामा करत सहा लॅब सील करण्याची मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. (Bhaskar More News)

सत्यशोधन समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आजच्या चौकशीचा आणि कारवाईचा प्राथमिक अहवाल तातडीने सोपवणार आहे. आम्ही दुसरा अहवाल सादर करताना अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टींचा समावेश करणार आहोत, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दुर केला जाणार आहे अशी माहिती समितीने माध्यमांशी बोलताना दिली. (Bhaskar More News)

शुक्रवारी दिवसभर सत्यशोधन समितीने रत्नदीप शैक्षणिक संकुल आणि संस्थापक डाॅ भास्कर मोरेंविरोधात विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी केली. ही समिती दिवसभर चौकशी करत होती. त्यानंतर या समितीने रात्री उशिरा अंदोलनस्थळी पुन्हा अंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी केलेल्या कारवाईची माहिती विद्यार्थ्यांना दिली. समितीने अंदोलन करा पण उपोषण करू नका अशी विनंती विद्यार्थ्यांना केली. (Bhaskar More News)

shital collection jamkhed

तुम्हाला न्याय देण्यासाठी तातडीने आम्ही प्राथमिक अहवाल सादर करणार आहोत, विद्यापीठ त्यावर कारवाई करेल.विद्यापीठाने आम्हाला दिलेल्या अधिकारानुसार रत्नदीप शैक्षणिक संकुलातील 6 लॅब आम्ही सील करण्याची कारवाई केली आहे.पुर्ण चौकशी करण्यासाठी वेळ लागणार आहे. तुमच्या सामुहिक आणि व्यक्तिगत तक्रारीवर सखोल चौकशी होणार आहे. त्यातून तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी डाॅ संदिप पालवे यांनी विद्यार्थ्यांना दिला. (Bhaskar More News today)

वैयक्तिक लेखी तक्रारी द्या तरच पुढच्या कारवाईला वेग येईल

तहसीलदार गणेश माळी व पोलिस निरीक्षक महेश पाटील हे दोन्ही अधिकारी तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या सगळ्यांबरोबर आहेत. त्यांचा कोणावरही रोष नाही. तुम्हीही त्यांच्यावर रोष ठेवणं चुकीचं आहे. प्रशासनाची कारवाई सुरु झालेली आहे. त्यांना वैयक्तिक तक्रारी द्या. लेखी तक्रारी बिनधास्त द्या. तक्रारींशिवाय कागदांशिवाय त्यांना पुढे काही करता येणार नाही. तुमचं कितीही खरं असलं तरी लेखी दिल्याशिवाय त्यांना काहीही कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की, लेखी तक्रार दिल्याशिवाय मोठी कारवाई होणार नाही, असा सल्ला यावेळी विद्यापीठ सत्यशोधन समितीने विद्यार्थ्यांना दिला. तसेच दुसऱ्या बाजूची चौकशी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या टीमने सुरु केलेली आहे. त्यांना चौकशीसाठी त्यांना सहकार्य करा असे अवाहनही समितीने यावेळी विद्यार्थ्यांना केले. (Bhaskar More latest News today)

रत्नदीपमधून सत्यशोधन समितीने घेतले अनेक कागदपत्रे ताब्यात

दरम्यान, सत्यशोधन समितीचे अध्यक्ष डाॅ संदिप पालवे यांनी अंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महत्वाची माहिती दिली. पालवे म्हणाले की, तुम्ही ज्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत त्या सर्व गोष्टींची चौकशी करण्यास आम्हाला वेळ मिळाला नाही. पण ज्या गोष्टी प्राधान्याने तुमच्या जीवनाशी निगडीत होत्या, काॅलेज प्रशासनाने तुम्हाला ज्या गोष्टींसाठी वेठीस धरले होते त्या गोष्टी आम्ही काढून आणल्या. तुमचे ओरिजिनल कागदपत्रे आम्ही ताब्यात घेतले आहेत. मार्कशीट सुध्दा ताब्यात घेतले आहेत. तुमच्याकडून कोरे घेतलेले स्टॅम्प ताब्यात घेतलेत. या दोन गोष्टी आम्ही काढून आणल्यात अशी माहिती देताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात समितीच्या कारवाईचे स्वागत केले. (Bhaskar More News)

तुमच्या तक्रारी बिनधास्त मांडा

तुम्हाला वैयक्तिक काही सांगायचे असेल तर सांगा. पण त्यात तुम्हाला काही अडचण असेल तर पुढच्या चौकशीवेळी समितीबरोबर एक महिला सदस्य घेऊन येऊ. त्यांच्याकडे तुमच्या तक्रारी बिनधास्त मांडा असे अवाहन समितीने विद्यार्थीनींना केले. तुम्हाला ज्या गोष्टी मांडायच्या आहेत त्या प्रॉपर चॅनलसमोर मांडा. तुमच्या तक्रारींची चौकशी सुरु झालेली आहे. अनेक विभागांची चौकशी पथके येणार आहेत. तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही कारवाई केलेली आहे. असेही सत्यशोधन समितीने यावेळी स्पष्ट केले. (Bhaskar More News)

विद्यार्थीनींचा ‘तो’ आरोप खरा ठरला

मंगळवारी रत्नदिपमधील शेकडो विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला.आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी डाॅ भास्कर मोरेंविरोधात मोर्चा काढत मोरे यांच्याकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्याला वाचा फोडली. मोरेंचा दुसरा चेहरा प्रशासन आणि जामखेडकरांसमोर उघडा पाडला. विद्यार्थ्यांनी मोरेंविरोधात अनेक गंभीर आरोप केले होते. विद्यार्थ्यांकडून कोरे स्टॅम्प पेपर घेतले जातात हा आरोप एका विद्यार्थीनीने केला होता.या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे सत्यशोधन समितीने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. सत्यशोधन समितीने रत्नदीप शैक्षणिक संकुलातून कोरे स्टॅम्प पेपर ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. (Bhaskar More News)

डॉ भास्कर मोरेंना कधी अटक होणार ?

रत्नदीप मधील विद्यार्थ्यांनी मंगळवारी काढलेल्या मोर्चावेळी 31 विविध मागण्या केल्या होत्या. डाॅ भास्कर मोरेंवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी ही त्यातील प्रमुख मागणी होती. या मागणीनुसार अंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी भास्कर मोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरेंना कधी अटक होते याकडे संपुर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Bhaskar More News)