बिग ब्रेकिंग : जामखेड बाजार समितीचा सभापती भाजपचा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संपुर्ण जामखेड तालुक्याची उत्सुकता शिगेला पोहचलेल्या जामखेड बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीत समसमान मते पडल्याने ईश्वरीय चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. यामध्ये सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले विजयी ठरले. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या राळेभात गटाकडून उमेदवारी केलेले विखे समर्थक कैलास वराट हे विजयी ठरले.

Big Breaking, Chairman of Jamkhed market Committee of BJP

जामखेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपकडून सभापतीपदासाठी शरद कार्ले व उपसभापती पदासाठी सचिन घुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर राष्ट्रवादीच्या राळेभात गटाकडून सभापती पदासाठी माजी सभापती सुधीर राळेभात व उपसभापतीपदासाठी विखे समर्थक कैलास वैराट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदी कैलास वराट यांची वर्णी लागली.