जामखेड बाजार समिती निवडणूक : सभापती- उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीवर कोणाचा कब्जा याचा थोड्याच वेळात फैसला होणार. जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपकडून सभापतीपदासाठी शरद कार्ले व उपसभापती पदासाठी सचिन घुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादीच्या राळेभात गटाकडून सभापती पदासाठी माजी सभापती सुधीर राळेभात व उपसभापतीपदासाठी विखे समर्थक कैलास वैराट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Jamkhed Market Committee Election, Nomination filed for the post of Chairman- Deputy Chairman

जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या गटाला 9 तर राष्ट्रवादीतील राळेभात गटाला 7 व राष्ट्रवादी सोबत युती केलेल्या विखे गटाला 2 जागा मिळाल्या होत्या. जामखेडकरांनी या निवडणुकीत फिफ्टी -फिफ्टीचा कौल दिल्यानंतर दोन्ही गटाचे नवनिर्वाचित संचालक सहलीवर रवाना झाले होते. आज होणाऱ्या जामखेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत जामखेडकरांना सरप्राईज मिळणार की चिठ्ठीच्या कौलावर ही निवड होणार याचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती. परंतू या पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत चिठ्ठीवर कौल होणार असेच प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतू वेगळा राजकीय चमत्कार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, सभापती आणि उपसभापती निवडणुकीच्या मतदानात काही चमत्कार न घडल्यास सध्या दिसत असलेल्या परिस्थितीवरून सभापती व उपसभापती पदाच्या निवडीचा कौल चिठ्ठीवर जाणार असेच संकेत मिळत आहेत जर असं घडल्यास कोणत्या उमेदवाराचे नशिब फळफळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.