Pune Jamabandi Commissioner Office | पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याने वापरली अर्वाच्च भाषा ; राज्यातील तलाठी झाले आक्रमक

कर्जत तहसील कार्यालयासमोर तलाठी कर्मचाऱ्यानी केली निदर्शने

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( कर्जत बातमीदार) : Pune Jamabandi Commissioner Office | पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालय राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी,पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष आप्पा डुबल यांना सोशल मिडीयावर अर्वाच्य भाषा वापरल्याने राज्यातील तलाठी आक्रमक झाले आहे आहेत. जगताप यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने होऊ लागले आहेत. याचे पडसाद कर्जत तालुक्यात सोमवारी उमटले. सोमवारी कर्जत तहसील कार्यालयासमोर तलाठी कर्मचाऱ्यानी निदर्शने करीत जगताप यांचा निषेध केला तसेच बदली करण्याची मागणी केली. (Arvachcha language used by an official of the Pune Jamabandi Commissioner Office; Talathi in the state became aggressive)

तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राज्यातील तलाठी, मंडळ अधिकारी हे महसुल प्रशासनाचे कार्य लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करीत महसुली उत्पन्नात वाढ करीत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना तळागाळापर्यंत राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. महसुली लेखेजोखे संगणकीकृत करणे, सातबारा , इ फेरफार, इ चावडी आदी योजना तलाठी आणि मंडळ अधिकारी रात्रदिवस काम करीत स्वखर्चाने सेवा पुरवित आहे. याच कामी महाराष्ट्र राज्य तलाठी,पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष आप्पा डुबल यांनी मंगळवार, दि ५ रोजी राज्यातील नैसर्गिक आपत्ती, इ पीक पाहणी आणि मोफत सातबारा खातेदाराना वितरण संदर्भात तलाठी व मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शनपर राज्य कार्यकारिणीच्या व्हाट्सअप ग्रुपवर संदेश पाठविला होता.

सदरचा मेसेज अन्य ग्रुपवर राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथील रामदास जगताप यांना मिळाला. त्यावर रामदास जगताप यांनी “मूर्खांसारखे मेसेज पाठवू नका” असे प्रति संदेश पाठवत डुबल यांना मूर्ख ठरविले. पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तलाठी संवर्गातील अव्वल कारकून, नायब तहसीलदार यांचा अपमान करणारी कृती जगताप यांनी केल्याने राज्यभरात जगताप यांच्या वोरोधात संतापाची लाट उसळली आहे. जगताप यांच्या विरोधात महसूल कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

शासनाने तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या उग्र भावनाचा विचार करीत रामदास जगताप यांची तातडीने अन्यत्र बदली करावी अन्यथा नाईलाजास्तव असहकार आंदोलन करण्याचा इशारा कर्जत तलाठी संघटनेने निवेदनाद्वारे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिला आहे.

यावेळी कर्जत तलाठी संघटनेचे अध्यक्ष धुळाजी केसकर, सचिव आनंद कोकाटे, कार्याध्यक्ष अविनाश रोडगे, मंडळ अधिकारी डी पी पाचारणे, महिला प्रतिनिधी प्रनोती घुले यांच्यासह आदी तलाठी कर्मचारी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते.

रामदास जगताप यांची तात्काळ बदली न झाल्यास आंदोलन वाढणार

तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी दि ७ व ८ रोजी काळ्या फिती लावत जगताप यांचा निषेध नोंदविला. ११ रोजी तहसील कार्यलयात निदर्शन आंदोलन करून या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. १२ रोजी डीएससी जमा करत लोकप्रतिनिधीना आंदोलनाबद्दल माहिती देण्यात येईल. यावर देखील जगताप यांच्यावर कारवाई न झाल्यास दि १३ पासून सर्व कामावर तलाठी आणि मंडळ अधिकारी बहिष्कार टाकतील अशी माहिती कर्जत तलाठी संघटनेचे अध्यक्ष धुळाजी केसकर आणि सचिव आनंद कोकाटे यांनी दिली.

 

Arvachcha language used by an official of the Pune Jamabandi Commissioner Office Talathi in the state became aggressive: