Atomic Energy Recruitment 2021 | अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी पदभरती जाहीर ‘असा’ करा अर्ज amd.gov.in

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Atomic Energy Recruitment 2021| अणु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय (Directorate of Atomic Mineral Exploration and Research)  भारत सरकारच्या अणू ऊर्जा विभागाने (Atomic Energy Department) गट ब व गट क या पदांसाठीची पदभरती (Recruitment) जाहीर केली आहे. यातुन 124 पदे भरली जाणार आहेत. यासंबंधी अणुऊर्जा विभागाने 10 ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिध्द केली आहे. (Recruitment for various posts in Atomic Energy Department announced)

अणु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयाने (AMD) प्रसिध्द केलेल्या AMD-3/2021 जाहिरातनुसार सायंटिफिक सायंटिस्ट, तंत्रज्ञ, उच्च विभाग लिपिक,ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) आणि सुरक्षा रक्षक ही पदे भरली जाणार आहेत.

तब्बल 124 जागांची भरती अणूऊर्जा विभागात केली जाणार आहे. यासाठी 24 ऑक्टोबर तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

अणू ऊर्जा विभागाने प्रसिध्द केलेल्या पदभरतीसाठी खालील प्रमाणे अर्ज करा

स्टेप 1 – अधिकृत वेबसाईट भेट द्या

स्टेप 2 –  तिथे संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 – त्यानंतर तुम्हाला हिंदी व इंग्रजीतील जाहिरात दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 4 – जाहिरातीत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 5 – त्यानंतर सर्व माहिती ऑनलाईन भरून अर्ज करा

अणुऊर्जा विभागातील पदभरतीसाठी आवश्यक पात्रता

1) सायंटिफीक सायंटिस्ट  – उमेदवार हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणित आणि 60% गुणांसह मान्यता विद्यापीठातून पदवीधर असावा.

2) तंत्रज्ञ बी –  उमेदवार हा संबंधित ट्रेनमध्ये एक वर्षाचा आयटीआय कोर्स केलेला तसेच मान्यताप्राप्त मंडळाकडून 60% गुण घेऊन SSC झालेला असावा

3) उच्च विभाग लिपिक (UDC) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह पदवीधर असावा, इंग्रजीमध्ये प्रतिमिनिट किमान 30 शब्दांच्या वेगाने टायपिंग येणे आवश्यक

4) ड्रायव्हर (साधारण ग्रेड ) – SSC उत्तीर्ण असावा, LMV लायसन्स आवश्यक, अनुभव तीन वर्षाचा असावा.

5) सुरक्षा रक्षक – किमान दहावी पास असावा

अणुऊर्जा विभागातील वरिल पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर आहे. उमेदवारांनी घाई न करता व्यवस्थित अर्ज करावा.

 

Atomic Energy Recruitment 2021| Atomic Energy Recruitment 2021 Recruitment for various posts in Atomic Energy Department announced