Maharashtra band | जामखेडमध्ये कडकडीत बंद सुरू : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद !  

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Maharashtra band  | उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज (सोमवारी) महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सोमवारी सकाळपासून जामखेड बंदला कडकडीत प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकान बंद आहेत. Strict closure in Jamkhed: All shops closed except essential services Maharashtra band

उत्तर प्रदेशातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याची घटना लखीमपुर खेरी या ठिकाणी घडली होती. देशातील बळीराजा एकटा नाही. त्याच्या पाठीशी संपुर्ण देश उभा आहे हे दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

जामखेड तालुक्यात सोमवारी सकाळपासून महाराष्ट्र बंद अंदोलास सुरूवात झाली. सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीने खर्डा चौकात रस्ता रोको अंदोलन केले. केंद्र व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध नोंदवला. केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अंदोलकांनी केली. अंदोलनात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे नेते,पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. जामखेडमधील बंद शांततेत सुरू आहे.

जामखेड शहरासह ग्रामीण भागातील काही गावांमध्ये बंद पाळला जात आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत जामखेड तालुक्यात बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत बंद सुरू आहे. पोलिसांनी बंद काळात कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त लावलेला आहे.