आमदार राम शिंदे यांचा आणखीन एक मोठा दणका, प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार निलंबित,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलांची नागपुर हिवाळी अधिवेशनात घोषणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत – जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार प्रा राम शिंदे कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या गेल्या अडीच तीन वर्षांच्या काळातील अनियमितेचा बुरखा फाडण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी कंबर कसली आहे.नागपुर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत आमदार राम शिंदे यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा टराटरा फाडला आहे.

Another blow by MLA Ram Shinde Tehsildar suspended along with provincial officials, Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil announced in Nagpur winter session

आमदार राम शिंदेंच्या दणक्यामुळे सहकार विभागातील एक अधिकारी 26 रोजी निलंबित झाल्यानंतर आज 27 रोजी कर्जतमधील दोन अधिकारी निलंबित झाले आहेत. सरकारच्या या कारवाईमुळे कर्जत – जामखेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार राम शिंदे यांच्या मागणीनंतर कर्जत उपविभागाचे प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले आणि कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्याची घोषणा आज 27 रोजी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कर्जत तालुक्यातील गौण खनिज संदर्भात कारवाई करण्यात कुचराई केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्ती करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या आत सदर चौकशी समिती सरकारला अहवाल देईल. त्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल अशी घोषणा महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना केली.

आमदार राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील अवैध गौण खनिजाबाबत मोठी अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित करत सरकारला आज जाब विचारला.आमदार राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गंभीर दखल घेत कर्जत उपविभागाचे प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले आणि कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्याची घोषणा केली.महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आता पुढचा नंबर कोणाचा ?

आमदार राम शिंंदे यांच्या तक्रारीनंतर बारामती ॲग्रो प्रकरणात सहकार विभागाचे विशेष लेखापरिक्षक अजय देशमुख यांना निलंबित करण्याची कारवाई सोमवारी झाली होती. त्यानंतर आज मंगळवारी कर्जत उपविभागाचे प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले आणि कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्याची कारवाई झाली, आता पुढचा नंबर कोणाचा याचीच उत्सुकता कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेला लागली आहे. दरम्यान, आमदार राम शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अडीच तीन वर्षात झालेल्या घडामोडी आता अधिकारी वर्गाच्या अंगलट येत असल्याने अनेक अधिकारी धास्तावले आहेत.

कर्जतमधील नेमकं प्रकरण काय ?

कर्जत तालुक्यात एकही अधिकृत खडीक्रेशर नसताना अधिकारी यांच्याशी संगनमत करुन रात्री मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जाते. यात वन्यजीव कायद्याचेही उल्लंघन होत आहे. याबाबत आमदार राम शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शासनाकडे झाली असून, त्यावर काय कार्यवाही झाली? अशीही विचारणा त्यांनी केली होती.

या प्रश्नाला महसूलमंत्री विखें यांनी लेखी उत्तर दिले आहे. कर्जत तालुक्यात ११ क्रशरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे. त्यापैकी खडीक्रशर धारकांवर अवैध उत्खननप्रकरणी दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. या तालुक्यात सात खाणपट्ट्यांना मंजुरी आहे. मात्र माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र संवेदनशील असल्याने तेथील पाच खाणपट्टे बंद स्थितीत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीबाबत निवेदन प्राप्त झाले असल्याचे विखे यांनी उत्तरात म्हटले होते. परंतू यावर आमदार राम शिंदे समाधानी झाले नव्हते. त्यामुळे आमदार राम शिंदे यांनी आज लक्षवेधी उपस्थित करत या प्रकरणात कारवाईची मागणी केली होती.