सरपंच प्रशांत (भाऊ) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 314 रूग्णांची नेत्र तपासणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील लोकप्रिय युवा नेते तथा जवळा गावचे कर्तव्यदक्ष सरपंच प्रशांत (भाऊ) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू निदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबीरात तब्बल 314 रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 55 रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे.

Eye examination of 314 patients on the occasion of Sarpanch Prashant Shinde's birthday

जामखेड तालुक्यातील जवळा गावचे सरपंच तथा आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले लोकप्रिय युवा नेते प्रशांत (भाऊ) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत भाऊ शिंदे युवा मंच आणि एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय हडपसर यांच्या सहकार्याने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जेष्ठ नेते मुरलीधर हजारे यांच्या हस्ते झाले.

जवळा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला जवळा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात 314 ३रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 78 रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरात 55 रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. या 55 रूग्णांवर येत्या आठ दिवसात हडपसर येथील एच. व्ही. देसाई  रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

यावेळी जेष्ठ नेते दशरथ कोल्हे, माजी उपसभापती दीपक पाटील, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कथले, सुशिल आव्हाड, डॉ. सुधीर ढगे, डॉ. राहुल मुळे, डॉ. कानिफ वायकर, सेवा सोसायटीचे माजी संचालक अंकल कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आव्हाड, राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल पाटील, ईश्वर हजारे, अमोल हजारे, बाबा महारनवर, राम हजारे,जीवन रोडे, सुरज मोहळकर, समीर शेख, विश्वजीत हजारे, औदुबंर कोल्हे, संदीप कोल्हे, अशोक हजारे, तानाजी पवार, जालिंदर कोल्हे, नाना कोल्हे यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

दरम्यान, नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सक्रीय असलेल्या प्रशांत (भाऊ) शिंदे युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी सरपंच प्रशांत भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या नेत्रतपासणी शिबिरामुळे अनेकांना फायदा झाला आहे. या सामाजिक उपक्रमाची सकारात्मक चर्चा जवळा पंचक्रोशीत होत आहे. सदरचा उपक्रम राबविल्याबद्दल अनेक रुग्णांनी प्रशांत (भाऊ) शिंदे युवा मंचचे आभार व्यक्त केले आहे.