जामखेड : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाखांचा निधी मंजुर, आमदार प्रा.राम शिंदे यांची मागणी सरकारने केली मंजुर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यासह देशातील धनगर समाज बांधवांचे ऊर्जाकेंद्र असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने 50 लाख रूपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. हा जयंती सोहळा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे 31 मे रोजी संपन्न होणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे निधीची मागणी केली होती.सरकारने ही मागणी मान्य केली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी 3 व 4 एप्रिल 2023 रोजी पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे. नियोजन विभागाने अहमदनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.

नियोजन विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-2024 अंतर्गतच्या ‘इतर जिल्हा योजनेतून’ एक वेळची विशेष बाब म्हणून 50 लक्ष रूपये इतका निधी इतर योजनांच्या बचतीतून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. यंदा 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांचा जयंती सोहळा या निधीतून साजरा केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील धनगर समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

50 lakh fund approved for Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar Jayanti 2023, MLA Prof. Ram Shinde's demand approved by the government, chondi,jamkhed news,

31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी (ता. जामखेड) या जन्मगावी होत असलेल्या जयंती सोहळ्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने 50 लाख रूपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. तसा आदेश सरकारने आज जारी केला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मनापासुन आभार !

आमदार प्रा राम शिंदे