जामखेड बाजार समितीची निवडणुक स्वबळावर लढवण्यासाठी सज्ज रहा- भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांचे कार्यकर्त्यांना अवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी (Jamkhed Bazar Committee Election 2023) भाजपकडून (BJP) ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्या सर्व उमेदवारांनी आजपासून निवडणूकीच्या कामाला लागावे. आपले नेते आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) जे उमेदवार देतील ते मान्य करावेत, ज्यांना थांबायचा आदेश येईल त्यांनी थांबायचं, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे, बाजार समिती निवडणूकीत (Jamkhed Market Committee Election 2023) युती होईल, नाही होईल, याकडे लक्ष न देता ही निवडणूक स्वबळावर लढायची आहे अशी रणनिती ठरवून सर्वांनी कामाला लागावे, असे अवाहन भाजपचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे (Ravindra Suravase) यांनी केले.

Be ready to fight the Jamkhed Bazar Committee elections on your own - BJP leader Ravindra Suravase

जामखेड येथील विठाई मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक पार पडली. बुथ सशक्तीकरण मोहिमेअंतर्गत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व भाजपा नेते – कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख, बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बैठकीला संबोधित करताना रविंद्र सुरवसे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना रविंद्र सुरवसे म्हणाले की, जामखेड बाजार समितीची निवडणूक भाजप पुर्ण ताकदीनीशी लढणार आहे. येत्या 20 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याकाळात युती होईल की नाही होईल याची वाट न पाहता आता या निवडणुकीला स्वबळावर सामोरे जायची तयारी करायची आहे. तालुक्यातील 25 पेक्षा अधिक सेवा संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. तसेच ग्रामपंचायतीमध्येही आपण एक नंबरवर आहोत, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही, त्यामुळे सर्व उमेदवारांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवूनच आजपासुन कामाला लागावे, असे अवाहन यावेळी सुरवसे यांनी केले.

Be ready to fight the Jamkhed Bazar Committee elections on your own - BJP leader Ravindra Suravase

यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले की, आजच्या बैठकीला सर्व नेतेमंडळी आणि गावकारभारी उपस्थित आहेत, ते सर्वजण मोठ्या राजकीय ताकदीचे आहेत, सर्वांनी जर ही निवडणूक हातात घेतली तर बाजार समिती पुन्हा आपल्या ताब्यात येईल. आपले नेते आमदार प्रा.राम शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी बाजार समिती निवडणुकीत झपाटून कामाला लागावे, असे अवाहन यावेळी मुंडे यांनी केले.

Be ready to fight the Jamkhed Bazar Committee elections on your own - BJP leader Ravindra Suravase

यावेळी बोलताना माजी सभापती भगवान मुरुमकर म्हणाले की, जामखेड बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढायची आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीत नेत्यांनी जातीने लक्ष घालून कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे आणि कार्यकर्ते निवडून आणले पाहिजेत. या निवडणुकीत नेत्यांनी जरी कुचराई केली तरी त्यांच्याही पुढे निवडणूका आहेत, संस्था कोणाकडे किती आहेत ? याचा हिशोब आपण करायचा नाही, त्या ठिकाणी आपली माणसं आहेत, त्या माणसांना जीव लावून आपल्याला या निवडणुकीत काम करायचे आहे, असे मुरुमकर म्हणाले.

Be ready to fight the Jamkhed Bazar Committee elections on your own - BJP leader Ravindra Suravase

यावेळी पार पडलेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे,बाळासाहेब महाडिक, भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रवि सुरवसे, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, सरचिटणीस शेखर खरमरे, भाजपा शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, मजुर फेडरेशनचे माजी संचालक मनोज कुलकर्णी, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, पांडुरंग उबाळे, सरचिटणीस लहू शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनिषा मोहळकर, विधी आघाडीचे ॲड प्रविण सानप, प्रविणशेठ चोरडिया, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, नगरसेवक अमित चिंतामणी, पिंपरखेडचे माजी सरपंच बापुराव ढवळे, माजी सभापती तुषार पवार, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे, बाजीराव गोपाळघरे, डाॅ गणेश जगताप, डाॅ बाळासाहेब बोराटे, उदयसिंह पवार, प्रसिध्दी प्रमुख उध्दव हुलगुंडे, आप्पासाहेब ढगे, ऋषीकेश मोरे, तुषार बोथरा सह आदी पदाधिकारी तसेच सर्व बुथ प्रमुख, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be ready to fight the Jamkhed Bazar Committee elections on your own - BJP leader Ravindra Suravase