जामखेड ब्रेकिंग : बाजार समिती निवडणुकीत दोन प्राध्यापक येणार एकत्र ? प्रा सचिन गायवळ यांनी घेतली आमदार राम शिंदे यांची भेट !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवस उरले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत कोण उमेदवार असणार? कोण माघार घेणार ? कोण बंड करणार? याकडेही सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. तसेच कोणाची कोणासोबत युती होणार ? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. अश्यात जामखेडच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांची चोंडी येथे सोमवारी मध्यरात्री भेट घेतली. या भेटीमुळे जामखेडच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत समोर येत आहेत.

Jamkhed breaking news, two professors will come together in Jamkhed Market committee election?, Prof. Sachin Gaiwal met MLA Ram Shinde at midnight

सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ हे भाजपसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत की तिसर्‍या आघाडीत जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जामखेडच्या राजकारणात प्रा सचिन गायवळ यांची मोठी राजकीय ताकद आहे. गायवळ यांनी सामाजिक कामांच्या माध्यमांतून जामखेडच्या राजकारणात स्वता:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली. सर्वच पक्षात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खर्डा गटात गायवळ यांची राजकीय ताकद मोठी आहे.याशिवाय जामखेड तालुक्यातही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. प्रत्येक गावात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषत: युवा वर्गात त्यांची लोकप्रियता मोठी आहे. विविध गावांचे सरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, संचालक हे गायवळ यांच्या पाठीशी एकवटलेले आहेत. बाजार समिती निवडणुकीत गायवळ कोणत्या पक्षाच्या पाठीशी उभे राहणार याची उत्सुकता आहे. अश्यातच प्रा सचिन गायवळ यांनी सोमवारी मध्यरात्री आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी आमदार शिंदे यांची भेट घेतली.

Jamkhed breaking news, two professors will come together in Jamkhed Market committee election?, Prof. Sachin Gaiwal met MLA Ram Shinde at midnight

शिंदे आणि गायवळ या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ राजकीय चर्चा झाली. बाजार समिती निवडणुकीत दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे या भेटीनंतर बोलले जात आहे. आमदार प्रा.राम शिंदेंना प्रा सचिन गायवळ यांची साथ मिळणार असल्याने जामखेडच्या राजकारणाची समीकरणे वेगाने बदलणार आहेत. दरम्यान आपल्या समर्थकांशी चर्चा करून गायवळ हे येत्या दोन दिवसांत आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. एकुणच सुरु असलेल्या घडामोडी पाहता गायवळ हे आमदार प्रा.राम शिंदे यांना साथ देण्याच्या मूडमध्ये असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बाजार समिती निवडणुकीत दोन्ही प्राध्यापक एकत्र आल्यास विरोधकांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.