जामखेड टाईम्स वृत्तसेवा । पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilyabai Holkar) यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी (Choundi) विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारने 4 कोटींचा निधी (4 crore sanctioned) मंजूर केला आहे अशी माहिती आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमांतून राज्य सरकारकडून 1995 सालापासून विकास केला जात आहे.
माजी ग्रामविकास मंत्री तथा जेष्ठ नेते आण्णा डांगे यांच्या पुढाकारातून चौंडीचा कायापालट झाला आहे. डांगे यांच्या माध्यमांतून चौंडी देशपातळीवर झळकली. गेल्या अनेक दिवसांपासून चौंडी विकास प्रकल्पातील अनेक विकास कामे निधी अभावी रखडली होती.
माजी मंत्री आण्णा डांगे यांच्याकडून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. तसेच आमदार रोहित पवार हेही पाठपुरावा करत होते. अखेर सरकारने चौंडी विकास प्रकल्पासाठी 4 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
- National Lok Adalat 2022 | अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत
- जामखेड पत्रकार संघात उभी फुट,11 जणांनी पुकारले बंड
- सरकारी कामात अडथळा, फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Kusadgaon SRPF Group 19 | कुसडगाव SRPF प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी 35 कोटींची वर्क ऑर्डर
- संत वामनभाऊ महाराज दिंडीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात संपन्न
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चौंडी गाव देशाच्या पर्यटन नकाशावर झळकावे याकरिता सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. चौंडी पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 4 कोटी 13 लाखाच्या निधीतून अनेक कामे राबवली जाणार आहेत. चौंडीतून वाहणाऱ्या सिना नदीचे सुशोभिकरण केल्यास पर्यटनात अधिक वाढ होण्यास मदत होईल.
कर्जत – जामखेड मतदारसंघात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा विकास झाल्यास या भागात पर्यटनाच्या माध्यमांतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टीनेच आमदार रोहित पवारांकडून मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा करत आहेत. याला मोठे यश येताना दिसत आहे.