जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवत जनसामान्य जनतेच्या मनावर ज्या मोजक्या नेत्यांनी अधिराज्य गाजवलं अश्या नेत्यांमध्ये लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव भाऊ कोल्हे यांचा समावेश होतो. आदरणीय भाऊंंचा आज पहिला स्मृतीदिन !
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचा गट कायम प्रभावी राहिला. याच गटात सहकार महर्षी गोपाळराव सोले पाटील आणि लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे या नेत्यांचा समावेश होता. विखे-सोले या दिग्गज नेत्यांबरोबर राजकारण करताना कोल्हे यांनी आपल्या कार्याचा जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला होता. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणूनही कोल्हे यांची ओळख होती. विखे – कोल्हे ही गुरू शिष्याची जोडी जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असायची.
स्वर्गीय जेष्ठ नेते श्रीरंगराव (भाऊ) कोल्हे यांचा जन्म 18 जुलै 1935 साली झाला. मागील वर्षी त्यांनी 86 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. जामखेड तालुक्याच्या राजकारणात त्यांनी नेहमी किंगमेकरची भूमिका साकारली.अहमदनगर जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थेचे ते 1979 ते 1989 अशी दहा वर्षे संचालक होते त्यापैकी दोन वर्षे त्यांनी चेअरमन पद भूषवले. तर जामखेड बाजार समितीचे ते अकरा वर्षे सभापती होते. तसेच 25 वर्षे ते जवळा गावचे सरपंच होते. त्यांच्या गटाकडे जवळा सोसायटीची सत्ता कायम राहीली. तसेच कोल्हे गटाकडे जामखेड तालुक्यातील एक तृतीयांश सत्ता नेहमी एकवटलेली असायची.
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील जुन्या पिढीतील यशस्वी राजकीय नेत्यांपैकी कोल्हे हे महत्वाचे नेते होते. कोल्हे यांच्या जाण्याने जामखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे मोठे राजकीय नुकसान झाले. स्वर्गीय श्रीरंग भाऊ कोल्हे यांचे मागील वर्षी निधन झाले. कोल्हे यांचे चिरंजीव दत्तात्रय कोल्हे साहेब व संपूर्ण कोल्हे कुटुंबियांच्या दु:खात माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कर्जतचे जेष्ठ नेते डॉ.आदिनाथ चेडे, डॉ शिषिकांत टेकाडे, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव वाघमारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, माजी सभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती तुषार पवार, माजी नगराध्यक्ष नामदेव राउत, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. महादेव पवार, जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी अप्पा पवार, ज्योती क्रांतीचे चेअरमन आजिनाथ हजारे, दशरथ हजारे, माजी सभापती सुभाष आव्हाड यांनी प्रत्यक्ष भेटून धीर दिला.
तर खासदार सदाशिव लोखंडे, आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे, पैठणचे माजी आमदार भाऊसाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष अभय अगरकर, माजी नगराध्यक्ष एकनाथ आळेकर या मान्यवरांनी फोन करून तसेच जामखेड तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य, राजकीय पक्षांचे व संघटनांचे तालुका अध्यक्ष,तालुक्यातील सरपंच, चेअरमन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोल्हे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत कोल्हे कुटुंबियांना धीर दिला.
तसेच नाशिक मनपाचे सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील,शहर अभियंता सुनील खुने साहेब, शहर अभियंता संजय घुगे साहेब,शहर अभियंता नितीन वंजारी साहेब, कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील साहेब, कार्यकारी अभियंता संजीव पवार साहेब, कार्यकारी अभियंता सचिन जाधव साहेब यांनी समक्ष भेटून तसेच व फोन द्वारे कोल्हे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होते कोल्हे कुटुंबाला धीर दिला.
कोल्हे कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर कोल्हे कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या पाठाशी खंबीरपणे उभे राहिल्याचे संपूर्ण वर्षभरात दिसून आले. आज स्वर्गीय श्रीरंग भाऊंचा पहिला स्मृतीदिन साजरा होत आहे. संपूर्ण वर्षभरात कोल्हे कुटुंबाच्या दु:खात सहभागी झालेल्या सर्वांच्या प्रति कोल्हे कुटुंबीयांकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.