जामखेड : राज्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक, जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पिकअप चोरी प्रकरणात करण्यात आली कारवाई !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या, दोघा सराईत गुन्हेगारांना, पिकअप चोरी प्रकरणात अटक करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी आज 19 रोजी सायंकाळी पार पाडली. सिनेस्टाईल पाठलाग करत ही कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी पोलिस स्टेशन हद्दीतील ज्योतिबाचीवाडी येथून 17/11/ 2022 रोजी रात्री दहा वाजता ते 18/ 11/ 2022 रोजी सकाळी सहा या वेळेत भीमा अमृता भगत (वय 47) यांच्या घरासमोरून M H -25- P 3206 महिंद्रा बोलेरो कंपनीची पांढर्या रंगाची पिकअप गाडी चोरीस जाण्याची घटना घडली होती. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनला येथे गु.रं.नं 306/22 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
19 रोजी सायंकाळी जामखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांना वाशी पोलिस स्टेशनमधून माहिती मिळाली की वरिल वर्णनाची पिक अप जामखेडच्या दिशेने आलेली आहे. तरी सदर गाडीचा आपल्या हद्दीत शोध घ्यावा. अशी माहिती मिळताच बडे यांनी याबाबतची माहिती पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस अंमलदारास कळवली. पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेबल विजयकुमार कोळी, पोलीस काँस्टेबल आबासाहेब आवारे यांच्या पथकाने सदर चोरी गेलेल्या पिक अपची सखोल चौकशी केली असता, सदर गाडी जामखेड ते सौताडा रोडने गेल्याची माहिती मिळाली.
जामखेड पोलिस पथकाने सौताडा रोडवर सदर पिकअपचा शोध घेतला सदर गाडी साकत फाटा येथे आढळून आली, सदर गाडीला पोलिसांनी गाडी आडवी लावत रोखले. सदर गाडीत दोन इसम होते. दोघांनाही पिक अप सह पोलिस स्टेशनला आणण्यात आले. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार जामखेड पोलिसांनी अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर ,बीड आणि आसाफ दस्तगीर शेख रा.रोहतवाडी ,ता.पाटोदा जि.बीड यास दोघांना अटक केली.
दरम्यान, जामखेड पोलिसांनी वाशी तालुक्यातील चोरी प्रकरणात अटक केलेल्या दोघा आरोपींची अधिक चौकशी केली असता त्या दोघांविरुद्ध राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जामखेड पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने अटक करण्याची कारवाई पार पाडल्याने त्यांचे कौतूक होत आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.अनिल भारती, पोलिस नाईक अविनाश ढेरे , पोलीस काँस्टेबल कोळी, आबासाहेब आवारे,प्रकाश जाधव यांनी केली. सदर आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता वाशी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर,बीड जि.बीड याच्याविरुद्ध दाखल असलेले गंभीर गुन्हे खालील प्रमाणे
1) 51/2010 भादवि कलम 379 गेवराई पोलिस स्टेशन
2) 65/2010 भादवि कलम 394, शिवाजीनगर,बीड पो.स्टे
3) 71/2012 भादवि कलम 395 नगर तालुका पो.स्टे
4) 94/2012 भादवि कलम 394 श्रीगोंदा पो.स्टे.
5) 330/2015 भादवि कलम 392 शिरूर पो.स्टे.जि.बीड
6) 373/2015 भादवि कलम 392 शिरूर पो.स्टे.जि.बीड
7) 198/2015 भादवि कलम 395 सातारा
8) 370/2015 भादवि कलम 395, कोतवाली पो.स्टे.
9) 88/2016 भादवि कलम 379 पाटोदा पो.स्टे
10) 198/2016 भादवि कलम 395 सातारा
11) 175/2016 भादवि कलम 379 फलटन
12) 59/2017 भादवि कलम 394 गातेगाव पो.स्टे.लातुर
आसाफ दस्तगीर शेख रा.रोहतवाडी ,ता.पाटोदा जि. बीड याच्याविरोधात दाखल असलेले गुन्हे खालील प्रमाणे
1) 33/2015 भादवि कलम 379 वैराग पो. स्टे. पंढरपुर
2) 175/2016 भादवि कलम 379 फलटन, सातारा
3) 411/2016 भादवि कलम 379 शिवाजीनगर, बीड
4) 59/2017 भादवि कलम 394 गातेगाव ,लातुर
5) 173/2017 भादवि कलम 394 पाथर्डी पो.स्टे.
6) 162/2018 भादवि कलम 379बीड तालुका पो.स्टे.
7) 382/2018 भादवि कलम 399 शिवाजीनगर, बीड