Emergency Alert Service | अचानक मोबाईल मोठ्याने वाजू लागला.. इमर्जन्सी अलर्टचा इशारा, देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘त्या’ मेसेजचे सत्य काय ? जाणून घ्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Emergency Alert Service | वेळ सकाळी साडेदहाची… मोबाईल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाईलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका हा आवाज कशाचा काहीच समजेना.आपला मोबाईल हॅक तर झाला नाही ना किंवा त्यातील डेटा तर चोरीला गेला नाही ना याच भीतीने नागरिक चिंताग्रस्त झाले. अचानक आलेल्या या मॅसेजने सर्वांचीच झोप उडवून दिली. याबाबत प्रत्येक जण सदर मॅसेजचा स्क्रीन शॉट काढून शेअर करून सदर मेसेजबाबतची चौकशी करू लागला होता.

Emergency Alert Service India government, Emergency Alert Service, Suddenly mobile phone started ringing loudly, What is the truth of that message which is causing stir across india, an emergency alert warning? find out

देशातील कोट्यावधी नागरिकांच्या मोबाईलवर अचानक आलेल्या या मेसेजबाबत चिंता करण्यासारखे काही नसल्याचे समोर येत आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने याबद्दल घोषणा केली नसली, तरीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा स्वरूपाची सेवा देऊ शकण्याच्या क्षमतेचा आहे. विशिष्ट भौगोलिक परिसरात अथवा देशभरात एकाच वेळी सर्व मोबाईल नंबरवर आपत्कालीन सूचना पाठविण्याची या विभागाची क्षमता आहे.

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वी म्हटले होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पोर्टल https://sachet.ndma.gov.in/ या विषयावर अधिक तपशिलाने माहिती देणारे आहे. राज्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. काही ठिकाणी पूरस्थितीचाही धोका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक मोबाईल युजरला आज सकाळी १०. २० ते १०. ३० च्या दरम्यान हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आपत्कालीन अलर्ट आला.

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्तीच्या वेळी असा अलर्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणार आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. भविष्यात आपल्या भागात काही आपत्कालीन सूचना द्यायची असेल तर आपल्या मोबाईलवर याप्रकारे अलर्ट दिला जाईल. आपल्याला असा अलर्ट आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचाव्यात आणि त्यांचे पालन करावे, असे आवाहनही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या पोर्टलवर यापूर्वी केले आहे. मोबाईलमध्ये असे वायरलेस अलर्ट बंद करण्याची सुविधादेखील दिलेली आहे. परंतु आपण त्याचा वापर करू नये. कारण तसे केल्यास तुम्हाला आपत्तीच्या पूर्व सूचना येणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.

हा अर्लट आणि मसेज नक्की काय आहे याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. अनेकांना आपला फोन हॅक होतोय की काय अशी भीती वाटू लागली. मोबाईलवर देण्यात आलेला हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन अलर्ट सेवेची चाचणी घेण्यासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Emergency Alert Service)

सर्वांच्या फोनवर अचानक हा अर्लटचा पॉप मेसेज आला. हा मेसेज काय आहे व अशा प्रकारची आपात्कालीन संदेश सेवेची चाचणी घेण्यात येत आहे याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या अलर्ट बाबत भीती निर्माण झाली तर अनेकांनी हा मेसेज नक्की गर्व्हरमेंटचा आहे का अशी शंका व्यक्त केली. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय (Ministry of Information Broadcasting) किंवा पीआयबीने याबाबत अद्यापही कोणतीही माहिती दिलेली नाही तसेच ऑफिशियल ट्विटर हँडलवरही याबाबत काही सांगण्यात आले नाही. (Emergency Alert Service)

आज (दि.20) सकाळी दहा वाजताच्या सुमारास अनेक नागरिकांचा फोन वाजू लागला. अनेकांना चालू फोन मध्ये पॉपअप मेसेज (Popup Message In Phone) आले. यामध्ये हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपत्कालीन संदेश (Emergency Message) सेवेचा भाग आहे असे सांगण्यात आले. आपत्कालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपत्कालीन अलर्ट हवे आहेत का याबाबत विचारण्यात आले. त्यासाठी हो किंवा नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते. आधी हा मेसेज इंग्रजी भाषेमध्ये तर नंतर मराठी भाषेमध्ये देण्यात आला. पॉपअप मेसेज आल्यानंतर काही नागरिकांना हा मेसेज व्हाईस स्वरुपात देखील देण्यात आला. हा मेसेज फक्त अँड्रॉईड वापरकर्त्यांना आला असून ॲपल आय़फोन वापरकर्त्यांना हा मेसेज आलेला नाही. (Department Of Telecommunication Govt Of India)