Chipalun news : नदीला पुर आल्याने मगरी घुसल्या चिपळूण शहरात; पण मगरीसोबत एकाने केलं भलतचं धाडस, पहा धक्कादायक व्हिडीओ

मुंबई  : महाराष्ट्राच्या सह्याद्री घाटमाथ्यासह कोकण आणि विदर्भ, खानदेश भागाचा पावसाचा जोर वाढला आहे. (Maharashtra Rain) विशेषता: कोकण किनारपट्टी (Konkan Coast) आणि घाटावर पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु आहे.अनेक भागातील नद्यांना पुर (Flood) आला आहे. यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागलं आहे. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नद्यांना पुर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. आता पूरग्रस्त भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नद्यांना पुर आल्याने मगरी (Crocodiles) शहरात घुसल्या आहेत. ही घटना चिपळूणमधून (chipalun) समोर आली आहे.

Chipalun news, Crocodiles entered Chiplun city due to flooding of the river, but one dared with crocodile, watch Shocking video, chipalun flood latest news,

चिपळूण व परिसरात पावसाचा जोर आहे. या भागात अतिमुसळधार पावसामुळे वाशिष्टी व शिव नदीला पुर आल्याने चिपळूण शहराच्या सखल भागात पाणी घुसले आहे. दरवर्षी चिपळूण शहराला पुराचा फटका बसतो. यंदाही पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पाण्याबरोबरच मगरी शहरात घुसल्या आहेत. अशीच एक मगर चिपळूणच्या जुना बाजार पुलावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

चिपळूणच्या जूना बाजार पुलावर आढळून आलेल्या मगरीला स्थानिक रहिवाश्याने दोरीने बांधल्याची घटना आता समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्तीच्या हातात दोरी असून त्याने त्या दोरीच्या सहाय्याने तिला बांधले असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी सुटका करण्यासाठी मगर धडपड असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.

दरम्यान, पुढील तीन चार दिवस कोकणसह महाराष्ट्र अनेक भागांना हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिपळूण वाशिष्टी आणि शिवनदीच्पा पुरात वाढ होण्याचा धोका आहे. या नद्यांमध्ये असलेल्या मगरी मानवी वस्त्यांमध्ये आढळून येऊ शकतात. रस्त्यांवर मगरींचा धोका असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. मगरी आढळून आल्यास छेडछाड न करता तात्काळ स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांना कळवावे, मगरीला छेडछाड करून धोका पत्करू नये.