Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल, वाचा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणातील सर्व मुद्दे !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Uddhav Thackeray Live । शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुंबईत आज दोन दसरा मेळावे पार पडले. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात तमाम शिवसैनिकांना काय संबोधन करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत शिंदेगटासह भाजपवर कडाडून हल्ला चढवला.

Uddhav Thackeray Attacks BJP With Shinde Group, Read All Points Of Uddhav Thackeray's Speech In Shiv Sena's Dussehra Rally today, Uddhav Thackeray shivsena dasara melava full speech in marathi, Uddhav Thackeray live,

शिवतीर्थावर पार पडलेल्या शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील महत्वाचे सर्व मुद्दे जाणून घेऊयात!

विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि दसरा मेळावे माझ्या लक्षात, पण असा मेळावा क्वचित.. आजचा दसरा मेळावा अभूतपूर्व आहे.. मी भारावून गेलो आहे

भाषणासाठी खूप मुद्दे आहेत.. तुमचं प्रेम पाहून मुद्दे असतील पण शब्द सुचणार नाहीत

आज जमलेली गर्दी नाही, माझ्या शिवसैनिकांची गर्दी

तुमच्या प्रेमाच्या जोरावर अडीच वर्ष कारभार केला

अजूनही डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिली नाही.. पण तुमच्यासमोर नतमस्त झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही

शिवसेनेत द्दारी केली.. ते गद्दारच आहेत… तुमची मंत्रीपदे काही काळ टिकतील, पण कपाळावरील गद्दाराचा शिक्का पुसता येणार नाही

इथे एक सुद्धा माणूस भाड्यानी आणलेला किंवा तासाची बोली लावून आणलेला नाही, इथे आलेल्या माता भगिनी, बुजुर्ग आणि दिव्यांगांना विचारा

माझ्या समोर बसलेले एकनिष्ठ आहेत, हीच ठाकरे कुटुंबीयांची कमाई

Uddhav Thackeray Attacks BJP With Shinde Group, Read All Points Of Uddhav Thackeray's Speech In Shiv Sena's Dussehra Rally today, Uddhav Thackeray shivsena dasara melava full speech in marathi, Uddhav Thackeray live,

दरवर्षी प्रमाणे रावण दहन होणार, पण यावेळचा काळ वेगळा आहे, आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता, आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे

माझी बोटं हालत नव्हती, शरीर निश्चल होतं, ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली ते कटप्पा निघाले.. उद्धव ठाकरेंना कट करत होते

पण त्यांना ठाऊक नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे..

त्यांना आपण सर्वांनी सर्वकाही दिलं, मंत्रीपदे दिली, आमदारकी खासदारकी दिली.. पण ज्यांना काही देऊ शकलो नाही ते आज माझ्यासोबत

बाळासाहेब नेहमी बोलायचे, तेच आज बोलतो.. ही शिवसेना एकट्याची नाही

एकजरी निष्ठावंत शिवसैनिक म्हणाला, ‘गेट आउट’ तर मी निघून जाईन

Uddhav Thackeray Attacks BJP With Shinde Group, Read All Points Of Uddhav Thackeray's Speech In Shiv Sena's Dussehra Rally today, Uddhav Thackeray shivsena dasara melava full speech in marathi, Uddhav Thackeray live,

बाप मंत्री, मुलगा खासदार.. नातू नगरसेवक.. त्याला शाळेत तर जाऊ दे

मी का मुख्यमंत्री झालो? का केली महाविकास आघाडी केली ?

अतिशय स्पष्टपणे सांगतो, का केली महाविकास आघाडी.. त्यांनी पाठीत खंजीर खुपसला , अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता

ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ, तेंव्हा त्यांचाही मान राखला होता

अमित शहा बोलले आमचं काही ठरलेलं नव्हतं, मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो

आज तुम्ही जे केलं, तेंव्हा ते तुम्ही का नाही केलं? सन्मानाने का नाही केलं? पण शिवसेना संपवायची होती

इतरांना बाजूला सारून सर्व केलं.. पण आता ‘त्याला’ शिवसेना प्रमुख व्हायचंय.. आहे का लायकी?

स्वतःच्या वडिलांच्या नावानी मतं मागची हिम्मत नाही…

वीस वर्षांनी आज आनंद दिघे का आठवले? आज ते बोलू शकत नाही म्हणून त्यांचं नाव आलं

बोलायची पंचाईत का होते कारण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कायदा चांगला कळतो.. देवेंद्र फडणवीस सभ्य माणूस आहे.. मी टोमणा मारला नाही

जाताना बोलून गेलेले, मी पुन्हा येईन.. दीड दिवस आलेत आणि गेलेत

कायद्याच्या चौकटीत राहून बोला असं ते म्हणाले, देवेन्द्रजी कायदा तुम्हालाच कळतो असं नाही.. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची हे नाही चालणार

कोण काय भाषा करतंय? चुन चुन के मारेंगे… ही काय कायद्याची भाषा…

आमच्या अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय..

ग्रामपंचायत निवडणुकीवेळी फोन करून सांगितलं जातंय, गप गुमाने त्या गटात जा नाहीतर केसेस बाहेर काढू

आज यांना शांत राहायला सांगितलं, म्हणून हे शांत आहेत.. शिवसैनिकांना त्रास झाला तर तुमचा कायदा तुमच्या मांडीवर ठेवा

एकतर्फी कायदा चालू देणार नाही

शिवसेना कशी चालवायची, हिंदुत्व तुम्ही शिकवू नका.. भाजप वाल्यांकडून हिंदुत्त्व शिकायची गरज नाही ”

भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही

अरे पाकिस्तानात जाऊन जिन्नाच्या थडग्यावर जाऊन डोकं ठेवून आलेला तुमचा नेता

काश्मीरमध्ये मुफ्तीसोबत बसणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्तव शिकवणार?

तुम्ही हिंदुत्व करत गाईवर बोलतात, महागाईवर बोला, पण हे दिसू नये म्हणून हिंदुत्वावर बोलतात

हृदयात राम पण हाताला काम पाहिजे

RSS चे हुसबाळे यांचं सर्वांच्या साक्षीने अभिनंदन करतो.. कारण तुम्ही संघाला आरसा दाखवायचं काम केलं

महागाई बेकारीवर बोला,

देश पुढे चाललाय असं तुम्हाला वाटतं, पण यावेळी हुसबळे यांनी आरसा दाखवला

कोंबडी चोर यांच्याबाबत या मेळाव्यात जास्त बोलायचं नाही, बाप चोरांवर यावेळी बोलायचं नाही..

हे व्यासपीठ एक विचारांचं व्यासपीठ आहे..

विचारांची परंपरा पुढे न्यायची आहे, मी परंपरा पुढे नेतोय

मोदींचं जेंव्हा सरकार आले तेंव्हा रुपयाचा भाव काय होता? सुषमा स्वराज यांचं भाषण होतं.. मला टीव्ही लावायला भीती वाटते..

आता काय स्थिती आहे? तेंव्हा स्वराज म्हणाल्या जेंव्हा रुपया घसरतो तेंव्हा देशाची पत घसरते

देशाचे मुख्यमंत्री पक्षाचे घरगुती मंत्री आहेत का?

आज अमित शहा यांना आवाहन देतो… आम्हाला जमीन पाहायची आहे.. आम्हाला पाकव्याप्त जमीन आणून दाखवा

आज सात आठ वर्ष झाली, मोदींच्या ती मुलाखती ऐकतो.. “पाकिस्तान को उनकी भासा मे जवाब देंगे:

एकीकडे चीन घुसलं आहे.. पाकिस्तान घुसलं आहे.. पाकव्याप्त काश्मीर परत आणले तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचू

महागाई वाढतेय, आमचे प्रक्पल्प गुजरातमध्ये चाललेत आणि हे मिंधे सरकार खाली मान घालून बसले

तो पुष्प म्हणायचा “झुकेगा नही, हे म्हणतात उठेगा नही साला”

दिल्लीत मुजरा आणि गल्ली गोंधळ.. यांच्या सरकारला १०० दिवस होत असतील पण ९० दिवस दिल्लीत गेले

माझी तयारी आहे, सर्व हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं, त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं हिंदुत्व सांगतो

विचार सोडले… विचार सोडले.. हे बोलणार्यांनो हे ऐका

शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं “जो देशावर प्रेम करतो तो आपला.. मुसलमान जरी असेल तरी तो आपला”

जर कुणी धर्माची मस्ती रस्त्यात दाखवली तर त्यांना आम्ही उत्तर देऊ

तुमचं हिंदुत्व कोणतं?

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा म्हणाले शिवसेना संपणारा पक्ष आहे.. देशात कोणता पक्ष राहणार नाही असं म्हणाले. सर्व पक्ष संपणार आणि एकच पक्ष उरणार… म्हणजे देश हुकूमशाहीकडे जातोय.. देशात गुलामगिरी येऊ शकते

मोहन भागवत यांचा मला आदर आहे.. मोहन भागवत मध्यंतरी मशिदीत जाऊन आले. म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं का?

मोहन भागवत मुसलमानांसोबत बोलतात तेंव्हा राष्ट्रकार्य, आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं?

मोहनजी मला विहारायचंय तुम्ही भाषणात महिला शक्ती बाबत बोललात..

उत्तराखंडमध्ये अंकिता नावाच्या कोवळ्या पोरीचा खून झाला…ज्या रिसॉर्टमध्ये तिचा खून झाला ते भाजप नेत्याचं होतं.. त्या हॉटेल मालकाला तिथे जे चालवायचं होतं ते तिला करायचं नव्हता म्हणून हे झालं

दुसरी बातमी वाचली बिल्किश बानो

तिच्यावर बळात्कार झाला, तिच्या मुलीचा आपटून खून झाला आरोप सिद्ध झाले.. नंतर गुजरात सरकारने आरोपींना सोडून दिलं आणि त्याचा सत्कार केला

अशात महिलाशक्तीबाबत काय बोलायचं

माझा एकदा विचार होता की या सभेला येण्याआधी नव्या हिंदुत्तवाचे विचार ऐकायला जावं

आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल असं कार्टून आलेलं

तुमचं बेकार हिंदुत्व आम्हाला पटणारं नाही

आज आम्ही विचार घेऊन चाललोय, त्यासाठी विचार ऐकवून सांगायला पुस्तकं आणलं

पूर्वी एक नाटक होतं. तो मी नव्हेच.. आता तो मीच, तो मीच.. असं चाललंय

जसं रावणाने संन्यासाचं रूप घेऊन सीतेचं हरण केलं, तसंच हे तोतये बाळासाहेनाचं रूप घेऊन शिवसेना पळवायला आले

तुम्ही शिवसेना पळवू देणार का ?

जर मी लक्ष घातलं असतं तर यांना हे मैदान मिळालं नसतं असं ते म्हणाले.. काय बापाची पेंड आहे का?

एका व्यासपीठावर एक सभा लावू.. तुम्ही भाजपची स्क्रिप्ट सोडून भाषण करून दाखवायचं

माझ्या बाजूला अजित पवार बसायचे, पण त्यांनी कधी माझा माईक खेचला नाही , माझ्या कानात उत्तर सांगितलं नाही

आम्ही सोबत असताना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घेऊन संभाजीनगर आणि धाराशिव केलं, त्यांना घेऊन आम्ही हिंदुराव वाढवत होतो

मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे.. मी शिवसेनेवरील संकटे बघत आलो आहे, आज माझ्या हातात काही नाही.. माझ्यासोबत चालायचं असेल तर निखाऱ्यावर चालायची जबाबदारी असेल, माझ्यासोबत चाललात तर रस्त्यात काटे असतील.. पाय रक्तबंबाळ होतील…

येत्या काळात शिवसेनेचा वणवा पेटणार ..

तुम्ही साथ आणि सोबत द्या.. मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन

एका अर्थी बरं झालं .. बांडगुळ छाटली गेली…

बांडगुळाची मुळे वृक्षाच्या फांद्यांमध्ये असतात, पण वृक्षाची मातीत असतात

ती बांडगुळ सेना आहे, आपल्याला महाराष्ट्राच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन त्यांना शिंगावर घ्यावं लागेल, प्रत्येक निवडणुकीत त्यांना हरवावं लागेल.

मला विश्वास आहे ज्या आदिशक्तीने महिषासुर मारला तीच महिषासुरमर्दिनी खोकासूर मारेल