पंकजा मुंडेंचे भाषण संपताच मेळाव्यात गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज

पंकजा मुंडे सावरगाव दसरा मेळावा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर दसरा मेळाव्यात गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा होता.पंकजा मुंडे यांचं भाषण होताच कार्यकर्त्यांनी मंचाजवळ धाव घेतली आणि एकच गोंधळ उडाला.

As soon as Pankaja Munde's speech was over there was chaos in the gathering, police lathi-charged, pankaja mundhe dasara melava news

कार्यकर्त्यांनी गर्दी केली.अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली. गोंधळाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार दसरा मेळाव्याला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत सेल्फीचा आग्रह धरला, सेल्फी घेण्यासाठी स्टेजकडे धाव घेतली, आणि यातूनच हा गोंधळ उडाल्याची माहिती समोर येत आहे.

आज पंकजा मुडें याचा सावरगावमध्ये दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. पंकजा यांच भाषण देखील झालं. मात्र भाषणापूर्वीच काही तरुण आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.

पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी करत पोलीस आणि कार्यकर्त्यांना शांतही केलं. मात्र पंकजा मुंडे यांचं भाषण संपताच कार्यकर्त्यांनी सेल्फीचा आग्रह धरला. कार्यकर्त्यांनी स्टेजकडे धाव घेतली. त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मेळाव्याच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर परिस्थिती आणखीनच चिघळली होती, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. परंतू पंकजाताईंनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांना शांत केले.