ACB Mumbai News : दोन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह हवालदार अडकला Anti-Corruption च्या जाळ्यात !

ACB Mumbai News : 2 लाख रूपयांची लाच स्वीकारताना पोलिस निरीक्षक व पोलिस हवालदाराला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption bureau Mumbai) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मुंबईत करण्यात आली.अटकपूर्व जामीन फेटाळालेल्या एका 35 वर्षीय पुरूष आरोपीला अटकेची भीती दाखवून त्याच्याकडे 25 लाख रूपयांच्या लाचेची मागण्यात आली होती. याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. (ACB Trap on mulund police station police inspector)

Today Mulund Police Inspector Bhushan Mukund Dayma and Constable Ramesh Machchindra Batkalas were caught by Mumbai Anti-Corruption Bureau for accepting bribe of two lakhs, acb mumbai news

मुंबईतील मुलुंड पोलिस ठाण्यात (mulund Police station) एका 35 वर्षीय तरूणाविरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्या तरूणाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. सदरच्या गुन्ह्यात आरोपी तरूणाला अटकेची भीती दाखवण्यात आली होती. ही अटक टाळण्याबरोबरच सदर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलिस निरीक्षक भूषण मुकुंद दायमा व हवालदार रमेश मच्छिंद्र बतकळस यांनी संबंधित तरूणाकडे 25 लाखाच्या लाचेची मागणी केली होती.  (Police inspector Bhushan Mukund Dayma and constable Ramesh Machhindra Batkalas in anti-corruption net)

संबंधित तरूणाने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 7 जूलै रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची 11 व 13 जूलै रोजी Mumbai ACB ने  खातरजमा केली. यात पोलिस निरीक्षक भूषण मुकुंद दायमा यांनी तडजोड करून 11 लाख रूपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार शुक्रवारी 14 जूलै रोजी सापळा रचण्यात आला होता. यावेळी पोलिस निरीक्षक भूषण मुकुंद दायमा व हवालदार रमेश मच्छिंद्र बतकळस या दोघांना तक्रारदार याच्याकडून लाचेचा पहिला हप्ता रूपये दोन लाख स्वीकारताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी मुलुंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) भूषण मुकुंद दायमा (वय 40) व हवालदार रमेश मच्छिंद्र बतकळस (वय 46) या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त विजय पाटील (Addl CP Vijay Patil), अपर पोलीस आयुक्त संजीव भोळे (Addl CP Sanjeev Bhole), अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कानडे (Addl SP Avinash Kande)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त साळुंखे पाटील (Assistant Commissioner of Police Salunkhe Patil), पोलीस निरीक्षक विद्या जाधव (PI Vidya Jadhav) व त्यांच्या सहकार्‍यांनी केली. (Mumbai ACB Trap Case Today)