जामखेड : जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे यांनी घेतली आमदार प्रा.राम शिंदे यांची भेट, भेटीचं कारण काय ? वाचा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या जवळा या गावचे सरपंच प्रशांत शिंदे यांनी भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. प्रशांत शिंदे हे सध्या राष्ट्रवादीत कार्यरत आहे. प्रशांत शिंदे यांनी भाजपा नेते आमदार राम शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या आहेत. मात्र आता या भेटीचे मोठे कारण समोर आले आहे. (jawala village sarpanch Prashant Shinde met MLA Ram Shinde, what is reason Read on)

jawala village sarpanch Prashant Shinde met MLA  Ram Shinde, what is  reason Read on

जवळा गावच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले प्रशांत शिंदे यांनी जवळा गावातील संत सावता महाराज मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जवळा येथील श्री संत सावता महाराज मंदिरासाठी सभामंडप, भक्तनिवास, स्वयंपाक गृह, पेविंग ब्लॉक सह विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी सरपंच प्रशांत शिंदे व त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने सरपंच प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार प्रा राम शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.

jawala village sarpanch Prashant Shinde met MLA  Ram Shinde, what is  reason Read on

जवळा येथील श्री संत सावता महाराज मंदिर परिसराच्या विविध विकास कामांबद्दल शिष्टमंडळाने आमदार प्रा.राम शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. संत सावता महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.या चर्चेनंतर आमदार प्रा राम शिंदे सदर कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी सरपंच प्रशांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिल हजारे,एकनाथ हजारे,राहुल पाटील, सावता हजारे,अमोल हजारे सह आदी उपस्थित होते. सावता महाराज मंदिर विकास कामांच्या चर्चेचा तपशील समोर आला असून राजकीय चर्चेचा तपशील मात्र कळू शकलेला नाही.

दरम्यान, जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेऊन काही राजकीय चर्चा केली का? याची सर्वांनाच उत्सुकता होती, यावर बोलताना विकास कामांसाठी ही भेट होती अशी माहिती सरपंच प्रशांत शिंदे यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.