Police inspector Transfers 2023  : पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी, कोणाची कुठे झाली बदली ? जाणून घ्या

पुणे : जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल (SP Ankit Goyal) यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश (Police Inspector Transfers Order) जारी केले आहेत. या आदेशामुळे पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले आहेत. दोन वर्षे सेवा कालावधी पुर्ण केलेल्या पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने नियुक्त केलेल्या नव्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पुणे पोलिस दलात बदलून आलेल्या नव्या अधिकाऱ्यांच्या नेमणूकाही करण्यात आल्या आहेत. (Pune Gramin Police Latest News)

Order issued for transfer of police inspectors working in Pune Rural Police Force, Police Inspector Transfers 2023, Police inspector Transfer latest news,

1) कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय शंकर जगताप यांची शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Sanjay Shankar Jagtap)

2) सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाळासाहेब घोलप यांची राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Annasaheb Balasaheb Gholap)

3) जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावस्कर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Umesh Tavaskar)

4) पोलिस निरीक्षक महेश कृष्णराव ढवाण यांची पोलिस कल्याण शाखेतून रांजणगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Mahesh Krishnarao Dhawan)

5) रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळवंत कुंडलिक मांडगे यांची मंचर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Balwant Kundlik Mandge)

6) राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सचिन दिनकर पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Sachin Dinkar Patil)

7) वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास शामराव भोसले यांची सुरक्षा शाखेत बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Vilas Shamrao Bhosale)

8) मंचर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सतिश भाऊसाहेब होळकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Satish Bhausaheb Holkar)

9) सुरक्षा शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक संतोष शामराव जाधव यांची सासवड पोलिस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Santosh Shamrao Jadhav)

10)जिल्हा वाहतुक शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बापूसाहेब पोपट सांडभोर यांची  जेजुरी पोलिस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. (Police Inspector Bapusaheb Popat Sandbhor)

पुणे ग्रामीण पोलिस दलात बदलून आलेल्या पोलिस निरीक्षक दर्जाच्या नव्या अधिकार्‍यांच्या खालील ठिकाणी नेमणुका करण्यात आल्या.

1) पोलिस निरीक्षक बबन शंकर पठारे यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. (Police Inspector Baban Shankar Pathare)

2) पोलिस निरीक्षक अण्णा मन्या पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे. (Police Inspector Anna Manya Pawar)

3) पोलिस निरीक्षक ललित भगवान वरटीकर यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली. (Police Inspector Lalit Bhagwan Vartikar)

4) पोलिस निरीक्षक रवींद्र दत्तात्रय पाटील यांची कामशेत पोलिस स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली आहे. (Police Inspector Ravindra Dattatraya Patil)

5) पोलिस निरीक्षक कुमार रामचंद्र कदम यांना वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे नियुक्त करण्यात आले आहे. (Police Inspector Kumar Ramchandra Kadam)

6) बारामती शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दिनेश सखाराम तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Police Inspector Dinesh Sakharam Tayde)

7) पोलिस निरीक्षक सुभाष सदाशिव चव्हाण यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. (Police Inspector Subhash Sadashiv Chavan)

8) पोलिस निरीक्षक राजेश गणेश गवळी यांची पोलिस कल्याण शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. (Police Inspector Rajesh Ganesh Gawli)

9) पोलिस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. (Police Inspector Suryakant Devarao Kokne)

10) पोलिस निरीक्षक सुहास लक्ष्मण जगताप यांची जिल्हा वाहतुक शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. (Police Inspector Suhas Laxman Jagtap)

11) भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणून शंकर मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Police Inspector Shankar Manohar Patil)