जामखेडमध्ये उद्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, विजेत्यांना मोठी बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात 22 रोजी सकाळी सहा वाजता खर्डा चौकातील ऊर्दू शाळेपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी इच्छूक स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धेचे आयोजक उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांनी केले आहे.

जामखेड शहरांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात. यंदाही या स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदा ही स्पर्धा रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन गट असणार आहेत. यामध्ये खुला गट 16 वर्षांपुढील वयोगटासाठी असणार आहे. यामध्ये पुरूषांना धावण्यासाठी 21 किलोमीटर तर महिलांना धावण्यासाठी 10 किलोमीटर अंतर असणार आहे.
तर कुमार गट हा 16 वर्षांखालील वयोगटासाठी असणार आहे. यामध्ये मुले आणि मुलींना धावण्यासाठी 5 किलोमीटर अंतर असणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणासाठी निःशुल्क नोंदणी असणार आहे. मात्र सर्व सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेला येताना सोबत आधारकार्ड आणावे असे अवाहन आयोजकांनी केले आहे.
यंदा होत असलेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी खालील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
पुरूष गट
1) प्रथम बक्षीस : रोख 21 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
2) द्वितीय बक्षीस : रोख 15 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
3) तृतीय बक्षीस : रोख 11 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
4) चतुर्थ बक्षीस : रोख 7 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
5) पाचवे बक्षीस: रोख पाच हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
महिला गट
1) प्रथम बक्षीस : रोख 11 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
2) द्वितीय बक्षीस : रोख 07 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
3) तृतीय बक्षीस : रोख 05 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
4) चतुर्थ बक्षीस : रोख 3 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
5) पाचवे बक्षीस: रोख 02 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
कुमार गट (मुले आणि मुली)
1) प्रथम बक्षीस : रोख 05 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
2) द्वितीय बक्षीस : रोख 03 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक
3) तृतीय बक्षीस : रोख 02 हजार रूपये, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रक