जामखेड टाइम्स वृत्तसेवा । यंदा पत्रकार दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा भाजपकडून यथोचित सन्मान करण्यात आला, मात्र प्रसिध्दी पिपासू राष्ट्रवादी आणि आमदार रोहित पवार त्याचबरोबर ऐरवी बातमी अन नावासाठी हापापलेल्या राष्ट्रवादीच्या तथाकथित नेत्यांनाही पत्रकार दिनाचा विसर पडला.
यंदा जामखेड तालुक्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधत भाजपने जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान केला. खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार प्रा राम शिंदे, तालुकाध्यक्ष अजयदादा काशिद यांनी भाजपच्या वतीने पत्रकारांना सन्मानित केले. मात्र आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीला यंदा पत्रकार दिनाचा विसर पडला. आमदार रोहित पवार यांच्यासह काँग्रेस, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना, इतर सामाजिक संघटना यांना यंदा पत्रकार दिनाचा विसर पडला आहे.
यंदा पत्रकार दिनानिमित्त जामखेड तहसिल कार्यालय, जामखेड पोलिस स्टेशन, जामखेड पंचायत समिती या तीनच शासकीय कार्यालयात पत्रकार दिन साजरा झाला, मात्र इतर प्रशासकीय कार्यालयांनाही पत्रकार दिनाचा विसर पडला.
गेल्या तीन वर्षांत आमदार रोहित पवार यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जायचे. रोहित पवार हे आमदार झाल्यापासून राष्ट्रवादी असो की काँग्रेस आणि इतर पक्ष यांना पत्रकार दिनाचा विसर पडलेला आहे. ही परंपरा अजूनही कायम आहे, यात यंदा आमदार रोहित पवार यांची भर पडली आहे.
पत्रकार दिन होऊन 15 दिवस लोटले आहेत. महाविकास आघाडी आणि आमदार रोहित पवार यांना पत्रकार दिनाचा विसर पडला आहे. ऐरवी दर महिन्याला पाच पंचवीस प्रेसनोट धाडून जामखेड तालुक्यातील पत्रकारांकडून प्रसिध्दीचा शिधा वाटप करणाऱ्या रोहित पवारांच्या यंत्रणेला यंदा पत्रकार दिनाचा विसर पडला आहे.