Jalgaon। भरधाव बसने कंटेनरला उडवले, 40 जण जखमी, जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जळगावहून भूसावळकडे भरधाव वेगाने निघालेल्या एस टी बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे.

Speeding bus blows up container, 40 injured, some students among injured, Bhusawal road accident

याबाबत सविस्तर असे की, जळगावहून भुसावळकडे निघालेल्या MH 20 BL 0947 या एस टी महामंडळाच्या बसने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

सदर बसमध्ये 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते. यामध्ये नशिराबाद येथील काही विद्यार्थ्यांचा समावेश होता. या भीषण अपघातात 40 च्या आसपास प्रवाशी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना तातडीन जिल्हा रुग्णालयात हलवले. जखमींपैकी 2 जण गंभीर जखमी आहे. इतर सर्व किरकोळ जखमी आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस करत सर्वांना धन्यवाद दिला. सर्वांवर उपचार करूनच सोडण्यात यावे अश्या सुचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. दरम्यान सदर अपघाताच्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार भोळे यांनी केली आहे.