जामखेड : खर्डा शहरातील सलून व्यावसायिकाची आत्महत्या !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सलून व्यावसायिक संजय विष्णू काळे यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खर्डा परिसरात खळबळ उडाली आहे. मयत संजय काळे यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

Jamkhed, Suicide of salon businessman in Kharda city

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डा येथील संजय विष्णू काळे (वय 53) यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकलेले नाही.

मयत संजय काळे हे सलून व्यावसायिक होते.खर्ड्यातील मेनरोड परिसरात त्यांचे दुकान होते. काळे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काळे यांनी काही काळ खर्डा ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून काम केले होते.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पाटील यांच्या टीमने भेट दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी खर्डा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक संभाजी शेंडे आणि पोलिस काँस्टेबल शेषराव म्हस्के हे करत आहेत.