Santosh Shinde Suicide Case : धक्कादायक ! तरूण उद्योजक संतोष शिंदे यांची कुटुंबासह सामुहिक आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये समोर आली खळबळजनक माहिती, राज्यात उडाली मोठी खळबळ !

कोल्हापूर  : तरूण उद्योजकाने आपल्या कुटुंबासह सामुहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. ही घटना गडहिंग्लज येथून समोर आली आहे.शनिवारी 24 जून 2023 रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

Shocking, Mass suicide of Santosh Shinde, young entrepreneur from Gadhinglaj along with his family, kolhapur latest news, Exciting information came out in suicide note,there was big stir in Maharashtra, Gadhinglaj latest news,

कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समुहाचे सर्वेसर्वा तरूण उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह जीवनयात्रा संपवण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.उद्योजक संतोष शिंदे यांच्या बेडरूममध्ये विषप्राशन व गळे चिरून घेऊन कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

तणावातून संतोष शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आधी आपली पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन (वय 14) या दोघांचा खून केला, त्यानंतर स्वता: आत्महत्या केली असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. परंतू यासंदर्भात गडहिंग्लज पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती अजूनही जारी केलेली नाही. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

शनिवारी सकाळी उद्योजक संतोष शिंदे हे आपल्या बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने शेजारच्या लोकांना बोलावून दरवाजा उघडला असता, बेडरूममध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती समोर येताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती.

संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव या चिठ्ठीत लिहून त्यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह हलवू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली. शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी फेरी मारून बंदचे आवाहन करत त्या दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले होते

संतोष शिंदे या तरूण उद्योजकाने अगदी कमी वयात आपल्या व्यवसायात मोठी भरारी घेतली होती. अर्जुन उद्योग समुहाच्या माध्यमांतून ते खाद्यतेल व्यवसायात कार्यरत होते. याशिवाय ‘विराज फुड्स’ या नावाने त्यांनी बेकरी उत्पादने सुरू केली. अल्पावधीत त्यांनी आपल्या व्यवसायात मोठा जम बसवला होता. मुंबई, कोकण, कर्नाटक, कोल्हापूर, सीमावर्ती भागात अर्जुन उद्योग समुहाने आपला जम बसवला होता.

उद्योजक संतोष शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलत कुटुंबासह आत्महत्या केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे याचा पोलिस शोध घेत आहेत. सामुहिक आत्महत्येच्या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरावर शोककळा पसरली आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, उद्योजक संतोष शिंदे यांच्याविरुद्ध काही दिवसांपुर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना तुरूंगवास झाला होता. तेव्हापासून संतोष शिंदे व त्यांचे कुटुंबीय ताणतणाव होते. अशी चर्चा घटनास्थळी होती, अशी माहिती आहे.