Santosh Shinde Suicide Case : उद्योगपती संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड, माजी नगरसेविकेसह पोलिस अधिकाऱ्याला सोलापुरातून अटक

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समुहाचे सर्वेसर्वा तथा तरूण उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह जीवनयात्रा संपवण्याची घटना शनिवारी 24 जून 2023 रोजी घडली होती. या घटनेत एक मोठी घडामोड समोर आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी माजी नगरसेविकेसह एका पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्याची मोठी कारवाई केली आहे.

Santosh Shinde Gadhinglaj , Big development in industrialist Santosh Shinde suicide case, former corporator Shubhada Patil along with police officer rahul raut arrested from Solapur

राज्यात खळबळजनक उडवून देणाऱ्या गडहिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil) व राहूल राऊत (Rahul Raut) या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी सोलापुर येथुन ताब्यात घेत अटक केली आहे. दोघे सोलापुरातील एका हाॅटेलमध्ये लपून बसले होते.

अर्जुन उद्योग समुहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे यांना माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil) व पोलिस अधिकारी राहूल राऊत (Rahul Raut) हे 1 कोटी रूपये खंडणी मागत होते. हे दोघे जण खंडणीसाठी संतोष शिंदे यांना त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वता:सह पत्नी व मुलाला संपवलं, एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येच्या घटनेनं राज्यात खळबळ उडाली होती. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये शुभदा पाटील व राहूल राऊत या दोघांच्या कारनाम्याचा उल्लेख होता.

शिंदे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil) व पोलिस अधिकारी राहूल राऊत (Rahul Raut)  हे घटनेनंतर गडहिंग्लजमधून फरार झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी वेगाने तपास करत दोघांना सोलापूरमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.

संतोष शिंदे या तरूण उद्योजकाने अगदी कमी वयात आपल्या व्यवसायात मोठी भरारी घेतली होती. अर्जुन उद्योग समुहाच्या माध्यमांतून ते खाद्यतेल व्यवसायात कार्यरत होते. याशिवाय ‘विराज फुड्स’ या नावाने त्यांनी बेकरी उत्पादने सुरू केली. अल्पावधीत त्यांनी आपल्या व्यवसायात मोठा जम बसवला होता. मुंबई, कोकण, कर्नाटक, कोल्हापूर, सीमावर्ती भागात अर्जुन उद्योग समुहाने आपला जम बसवला होता.

उद्योजक संतोष शिंदे यांच्याविरुद्ध काही दिवसांपुर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना तुरूंगवास झाला होता. तेव्हापासून संतोष शिंदे व त्यांचे कुटुंबीय ताणतणाव होते. याशिवाय माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil) व पोलिस अधिकारा राहूल राऊत (Rahul Raut) हे दोघे संतोष शिंदे यांना एक कोटीची खंडणी मागत होते. आधीच ताणतणाव असलेल्या शिंदेंच्या मागे खंडणीचा ससेमिरा लागला होता. यामुळे ते अधिकच तणावात होते. पाटील व राऊत यांच्याकडून होणारा मानसिक छळास कंटाळून संतोष शिंदे यांनी कुटूंबचं संपवून टाकलं, एका तरूण उद्योजकाचा झालेला करूण अंत कोल्हापूरकरांच्या मनाला चटका लावून गेला.

शिंदे यांनी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका, पोलिस अधिकारी राहुल राऊत तसेच संतोष शिंदे यांच्याकडून साडेसहा कोटी रुपये घेतलेले पुण्यातील विशाल बाणेकर आणि संकेत पाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भातील फिर्याद संतोष यांचे नातेवाईक शुभम बाबर यांनी दिली.

दरम्यान, संतोष शिंदे यांनी ज्या पद्धतीने आयुष्याचा शेवट केला ते पाहून अक्षरशः काळजाचा थरकाप उडाला आहे. त्यांनी आपल्या बेडरूममध्ये आत्महत्या करताना विषप्राशन केले आणि गळ्यावर सुरी ओढून घेतली. त्यामुळे बेडरूममध्ये रक्ताचा सडा पसरला होता, इतकेच नव्हे तर भिंतींवरही रक्ताचे डाग पसरले गेले होते. बेडरूममधे सर्वत्र रक्ताचे डाग आणि फरशीवर रक्ताचे पाट वाहिल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे मुलाने अशा पद्धतीने शेवट केल्याने त्यांच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संतोष यांच्यावर महिनाभरापूर्वी कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांना अटक होऊन वीस ते पंचवीस दिवस कारागृहात काढावी लागली होती. त्यामुळे ते निराशेमध्ये गेले होते. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर सुद्धा झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्योग सुरू करण्यासाठी लक्ष दिले. मात्र निराशा त्यांची पाठ सोडत नव्हती. बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती.

http://jamkhedtimes.com/shocking-mass-suicide-of-santosh-shinde-young-entrepreneur-from-gadhinglaj-along-with-his-family-kolhapur-latest-news-exciting-information-came-out-in-suicide-notethere-was-big-stir-in-maharashtra/