Monsoon 2023 Update: हवामान खात्याने जाहीर केला मान्सूनचा नवा अंदाज, राज्यात पुढील पाच दिवसांत पावसाची स्थिती काय असेल ? जाणून घ्या सविस्तर!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Monsoon 2023 Update: बिपरजाॅय चक्रीवादळामुळे रखडलेल्या मान्सूनने शनिवारी महाराष्ट्रातील काही भागात हजेरी लावली. सकाळपासूनच राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहेत.उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जामखेड तालुक्यातील काही भागात शनिवारी हलक्या सरी बरसल्या. शनिवारी दुपारी हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या अंदाजानुसार काही भागांना येलो तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

monsoon 2023 latest update, Meteorological department has announced new monsoon forecast, what will be the condition of rain in the next five days maharashtra? Learn more

राज्यात सर्वदुर मान्सून दाखल झालेला नाही. येत्या चार पाच दिवसांत तो संपुर्ण राज्यात दाखल होईल. शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पाऊस सुरु झाला आहे. शनिवारी मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर या भागात पाऊस झाला. हलक्या सरी कोसळत आहेत. वाहून निघेल असा पाऊस राज्यात कोठेही झालेला नाही. अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला.पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सक्रीय राहणार असल्याची माहिती, पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

राज्यात पुढचे 5 दिवस धो-धो पावासाचे असणार आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार पाऊस पडणार आहे तर पुणे सातारा नाशिक भागात सुध्दा मुसऴधार ते अती मुसऴधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडामध्येही पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून पुढील पाच दिवसांत महाराष्ट्राचा बहुतांश भाग मान्सून व्यापणार आहे. आषाढी एकादशी यंदा पावसात साजरी होणार आहे. पुढचा आठवडा पावसाचा असणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

शुक्रवारी विदर्भातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे विदर्भातील तापमान आठ ते दहा अंशाने घटले आहे. विदर्भात उष्णतेची लाट सक्रीय होती. ती आता घटली. शनिवारी सकाळपासूनच कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सकाळपासून मुंबई व परीसरामध्ये काही ठिकाणी हलका, मध्यम पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पुण्यातही सकाळी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोवा भागात पाऊस सुरू झाला आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला.

खरिप हंगाम 2023 साठी सज्ज झालेला बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत होता, परंतू गेल्या महिन्याभरापासून पाऊस गायब होता. राज्यातील पाणीसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केलीय. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालीय, त्यामुळे शासनाने टँकर सुरू केलेत. एकिकडे पंढरीच्या वारीचा उत्साह तर दुसरीकडे पावसासाठी आभाळाकडे डोळे अशी परिस्थिती असतानाच आता आनंदाची बातमी समोर आलीय. राज्यात मान्सून सक्रीय होऊ लागला आहे. येत्या आठवडाभरात संपुर्ण महाराष्ट्रात पाऊस धो-धो बरसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पेरण्या खोळंबल्या..

राज्यात पावसाने दडी मारल्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शुक्रवारपासून पाऊस काही भागात पावसाने हजेरी लावलीय, यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वदुर मुसळधार पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्यांना सुरूवात होईल. जोवर 100 मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरण्यांसाठी घाई करू नये, असे कृषि विभागाने म्हटले आहे.