Santosh Shinde death case : “माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. माझ्या चिमुकल्या नातवाचा काय गुन्हा होता,” वृध्द आईच्या हंबरड्याने उपस्थितांना आश्रू अनावर, आरोपींना न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी !

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथील उद्योगपती संतोष शिंदे मृत्यू प्रकरणात दोघा आरोपींना रविवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. सोलापुर येथुन माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil) व एपीआय राहूल राऊत (API Rahul Raut) या दोघांना अटक करण्यात आली. अटकेतील दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Gadhinglaj Santosh Shinde death case, Accused Shubhada Patil rahul raut five days in police custody, “My son was straight and honest. What crime my little grandson had committed,” old mother's cry audience to tears,

24 जून 2023 रोजी गडहिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती.आत्महत्या करते वेळी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये चौघांची नावे लिहिली होती. यामध्ये माजी नगरसेविका शुभदा पाटील व एपीआय राहूल पाटील व पुण्यातील दोघे असे चौघांचा समावेश होता.माजी नगरसेविका शुभदा पाटील व राहुल राऊत या दोघांनी एक कोटी रूपयांच्या खंडणीसाठी मयत संतोष शिंदे यांना त्रास दिला होता. तसेच संतोष शिंदे यांचा मुलगा अर्जुन सोबत सुध्दा गैरवर्तणूक केली होती. 

माजी नगरसेविका शुभदा पाटील रा गिजवणे रोड गडहिंग्लज (Shubhada Patil) व अमरावती पोलिस कंट्रोलमध्ये कार्यरत पोलिस अधिकारी राहूल राऊत (रा निलजी ता. गडहिंग्लज (Rahul Raut) हे दोघे संतोष शिंदे यांच्याकडे 1 कोटी रूपयांची खंडणी मागत होते. हे दोघे जण खंडणीसाठी संतोष शिंदे यांना त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वता:सह पत्नी व मुलाला संपवलं, घटना घडल्यापासून शुभदा पाटील व राहूल राऊत हे दोघे फरार झाले होते. त्यांना संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी सोलापुर येथुन अटक केली. दोघे सोलापुरातील एका हाॅटेलमध्ये लपून बसले होते.

शुभदा पाटील व राहूल राऊत या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुण्यामधील विशाल बाणेकर आणि संतोष पाटे यांची नावेही सुसाईड नोटमध्ये आहेत. पुण्यातील दोघांची नावे आर्थिक व्यवहारातून लिहिली आहेत. त्यामुळे पोलिस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांनी संतोष शिंदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांनी संतोष शिंदे यांच्या घरी रविवारी (25 जून) भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा शिंदे, बहीण प्रतिभा मांडेकर आणि नातलगांनी हंबरडा फोडला. संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी माझ्या नातवाचा दोष तरी काय? असे म्हणत आक्रोश केला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनाही अश्रू अनावर झाले. मुश्रीफ घरी पोहोचतात संतोष शिंदे यांच्या आई सुमित्रा यांनी हंबरडा फोडला. त्या रडतच सांगत होत्या, “माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. कष्टातून उभं राहिलेलं आमचं कुटुंब आहे. माझ्या चिमुकल्या नातवाने काय गुन्हा केला होता,” असे म्हणताच मुश्रीफ यांनाही अश्रू अनावर झाले.

पुणे येथील बाणेकर व पाटे यांच्याशी संबंधित व्यवहारांची देखील चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर याबाबतही निश्चित कारवाई करु, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली

संतोष शिंदे या तरूण उद्योजकाने अगदी कमी वयात आपल्या व्यवसायात मोठी भरारी घेतली होती. अर्जुन उद्योग समुहाच्या माध्यमांतून ते खाद्यतेल व्यवसायात कार्यरत होते. याशिवाय ‘विराज फुड्स’ या नावाने त्यांनी बेकरी उत्पादने सुरू केली. अल्पावधीत त्यांनी आपल्या व्यवसायात मोठा जम बसवला होता. मुंबई, कोकण, कर्नाटक, कोल्हापूर, सीमावर्ती भागात अर्जुन उद्योग समुहाने आपला जम बसवला होता.

उद्योजक संतोष शिंदे यांच्याविरुद्ध काही दिवसांपुर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना तुरूंगवास झाला होता. तेव्हापासून संतोष शिंदे व त्यांचे कुटुंबीय ताणतणाव होते. याशिवाय माजी नगरसेविका शुभदा पाटील (Shubhada Patil) व पोलिस अधिकारा राहूल राऊत (Rahul Raut) हे दोघे संतोष शिंदे यांना एक कोटीची खंडणी मागत होते. आधीच ताणतणाव असलेल्या शिंदेंच्या मागे खंडणीचा ससेमिरा लागला होता. यामुळे ते अधिकच तणावात होते. पाटील व राऊत यांच्याकडून होणारा मानसिक छळास कंटाळून संतोष शिंदे यांनी कुटूंबचं संपवून टाकलं, एका तरूण उद्योजकाचा झालेला करूण अंत कोल्हापूरकरांच्या मनाला चटका लावून गेला.

शिंदे यांनी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका, पोलिस अधिकारी राहुल राऊत तसेच संतोष शिंदे यांच्याकडून साडेसहा कोटी रुपये घेतलेले पुण्यातील विशाल बाणेकर आणि संकेत पाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भातील फिर्याद संतोष यांचे नातेवाईक शुभम बाबर यांनी दिली.

दरम्यान, संतोष शिंदे यांनी ज्या पद्धतीने आयुष्याचा शेवट केला ते पाहून अक्षरशः काळजाचा थरकाप उडाला आहे. त्यांनी आपल्या बेडरूममध्ये आत्महत्या करताना विषप्राशन केले आणि गळ्यावर सुरी ओढून घेतली. त्यामुळे बेडरूममध्ये रक्ताचा सडा पसरला होता, इतकेच नव्हे तर भिंतींवरही रक्ताचे डाग पसरले गेले होते. बेडरूममधे सर्वत्र रक्ताचे डाग आणि फरशीवर रक्ताचे पाट वाहिल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे मुलाने अशा पद्धतीने शेवट केल्याने त्यांच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संतोष यांच्यावर महिनाभरापूर्वी कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांना अटक होऊन वीस ते पंचवीस दिवस कारागृहात काढावी लागली होती. त्यामुळे ते निराशेमध्ये गेले होते. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर सुद्धा झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्योग सुरू करण्यासाठी लक्ष दिले. मात्र निराशा त्यांची पाठ सोडत नव्हती. बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती.