संगमनेर: म्हाळुंगी नदीच्या पुलासह रस्त्यांच्या कामाला ७ कोटींचा निधी मंजूर, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नांना मिळाले मोठे यश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेरच्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आणि संगमनेर शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी एकुण ७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

Sangamner, 7 crores sanctioned for road works including Mhalungi river bridge, efforts of MP Sadashiv Lokhande got great success, sangamner latest news,

मागील वर्षी पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन,घोडेकर मळा या भागात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात होत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी म्हाळुंगी नदीवरील पूल होण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या पुलाच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी तसेच शहरांतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिवांना दिले होते. त्यानुसार वैशिष्ट्येपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषदांना वितरित करावयाच्या निधीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर आणि पंपिंग स्टेशन कडे जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी साडेचार कोटी रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत इंदिरा गार्डन आणि गार्डनचा दक्षिण व उत्तर बाजूचा परिसर सुशोभीकरण करणासाठी २० लाख रूपये,  संगमनेर नगरपरिषद हद्दीत लिंक रोड नाशिक पुणे हायवे चौक सुशोभीकरण २० लाख, संगमनेर नगरपरिषद हद्दीतील भारत चौक सुशोभीकरण करणे १५ लाख, संगमनेर नगरपरिषद हद्दीत साई श्रद्धा चौक सुशोभीकरण करणे २० लाख रूपये.

संगमनेर नगरपरिषद हद्दीत कोल्हेवाडी रोड नाटकी नाल्यावर पूल बांधणे आणि सुशोभीकरण करणे ३० लाख रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत स.नं. १५६ सखाहरी गुंजाळ यांचे खुल्या जागेत सुशोभीकरण कामासाठी १५ लाख रूपये, संगमनेर नगरपरिषद हद्दीत स.नं१२४ (३७२) पे. मधील ओपन स्पेस मध्ये सुशोभीकरण कामासाठी १० लाख रूपये.

संगमनेर नगरपरिषद हद्दीत पाव बाकी रोड दुतर्फा बाजूस फुटपाथ करून सुशोभीकरण कामासाठी  ७० लाख रूपयांचा निधी, संगमनेर नगर परिषद अलकानगर नाटकी नाल्यावर पूल बांधणे व सुशोभीकरण कामासाठी ३० लाख रूपयांचा  आणि संगमनेर नगरपरिषद हद्दीत कुरणरोड कडे जाणारा नाटकी नाल्यावर पूल बांधणे व सुशोभीकरण कामासाठी २० लाख रूपये असा एकूण ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे खासदार श्री. लोखंडे यांनी सांगितले