Biparjoy Cyclone Update : बिपरजाॅय चक्रीवादळ जाखाऊ पोर्टवर धडकणार, गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी, अनेक भागात मुसळधार पावसास सुरूवात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अरबी समुद्रात घोंघावत असलेले बिपरजाॅय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) आज सायंकाळपर्यंत गुजरातच्या (Gujrat Biparjoy Cyclone) समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाचे परिणाम गुजरातमध्ये दिसू लागले आहे. गुजरातच्या अनेक भागात मुसळधार ( Heavy Rain) पावसास सुरूवात झाली आहे. बिपरजाॅय चक्रीवादळ कच्छच्या जखाऊ (Jakhau port) समुद्री किनार्‍यावर आज धडक मारणार आहे. या भागातल्या हजारो नागरिकांचे प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरण केले आहे.

Cyclone Biparjoy will hit Jakhau port, high alert issued in Gujarat, heavy rains in many areas, Biparjoy Cyclone latest live update today,

गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या बिपरजाॅय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 50 हजार पेक्षा अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. कच्छ भागात बिपरजाॅय चक्रीवादळाचे लँडफाॅल होणार आहे. या भागात तुफानी वारे वाहत आहेत. समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. काही भागात 15 फुटांच्या लाटा उसळत असल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

बिपरजाॅय चक्रीवादळाची तीव्रता प्रचंड असल्यामुळे या भागात ताशी 120 ते 150 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा मोठा धोका आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.बिपरजाॅय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. कच्छ, द्वारका, जामनगर, सौराष्ट्र या भागात मुसळधार पावसास सुरूवात झाली आहे.

गुजरात समुद्री किनार्‍यावर धडक मारणाऱ्या बिपरजाॅय चक्रीवादळाचे लँडफाॅल जाखाऊ पोर्टवर होणार आहे. या प्रतिक्रियेला एक ते चार तासांचा कालावधीत लागू शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे.