राज्यातील 30 जिल्हा परिषद अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहिर, अहमदनगरमध्ये अध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या मातब्बरांचा झाला हिरमोड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ग्रामविकास विभागाने राज्यातील 30 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर केले आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहिर करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचेही आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या मातब्बरांचा मात्र अहमदनगरमध्ये हिरमोड झाला आहे.

Reservation of 30 Zilla Parishad president posts in  Maharashtra announced

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडलेल्या असतानाच ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर केल्या जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दिवाळी नंतर निवडणुकांची घोषणा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान महापालिक आणि नगरपालिका निवडणूका निवडणूकांबाबत अजून कुठलाच निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे तसेच सोलापुर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (OBC) साठी आरक्षित झाले आहे. तर अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे अध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. आता अनुसूचित जमाती मधील तगड्या उमेदवाराच्या शोधासाठी राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण खालील प्रमाणे

पुणे : खुला प्रवर्ग
सोलापुर : नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
अहमदनगर: अनुसूचित जमाती
ठाणे : सर्वसाधारण

पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग  : सर्वसाधारण

नाशिक : सर्वसाधारण (महिला)
धुळे : सर्वसाधारण (महिला)
जळगाव : सर्वसाधारण
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)

सातारा  : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली : सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर सर्वसाधारण (महिला)
औरंगाबाद: सर्वसाधारण

बीड : अनुसूचित जाती
नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
उस्मानाबाद: सर्वसाधारण (महिला)
परभणी : अनुसूचित जाती

जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग
लातुर : सर्वसाधारण (महिला)
हिंगोली  : सर्वसाधारण (महिला)
अमरावती : सर्वसाधारण (महिला)

अकोला : सर्वसाधारण (महिला)
यवतमाळ : सर्वसाधारण
बुलडाणा : सर्वसाधारण
वाशिम : सर्वसाधारण

नागपुर : अनुसूचित जमाती
वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
चंद्रपूर : अनुसूचित जाती (महिला)
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
गोंदिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग
गडचिरोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग