मुंबईचा डबेवाला कोणाच्या बाजूने ? दसरा मेळाव्याआधी डबेवाल्यांनी घेतला मोठा निर्णय !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरी उफाळून आल्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद उफाळून आला. यावर अजून कायदेशीर निर्णय होणे बाकी आहे. आता शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यावरुन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांकडून दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे. अश्यातच मुंबईचा डबेवाला नेमका कोणच्या बाजूने ही चर्चा सुरू झाली होती. आता याबाबतचा सस्पेन्स आता उठला आहे.

On whose side is the Dabewala of Mumbai? Before Dussehra Melava Dabewalas took big decision

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे कोण कोणत्या दसरा मेळाव्याला हजेरीला लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. राज्यभरातून येणारा शिवसैनिक आपल्या दसरा मेळाव्याला (shivsena dasara melava Mumbai) उपस्थित राहावा म्हणून शिवसेना आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून मोठी ताकद लावली जात आहे, मुंबई महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहे. (Shivtirtha Dussehra melava Mumbai Dabewala will go to Shivtirtha)

शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर डबेवाले कामगारांमध्ये चल-बिचल निर्माण झाली होती; परंतु मावळ, मुळशी, खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील बहुतांश डबेवाले (Mumbai Dabewala Shivtirtha) आणि डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Dabewala with Shivsena) यांच्यासोबत आहेत,अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली आहे. (Mumbai Dabewala Association Shiv Sena)

खरी शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच खऱ्या शिवसेनेचे नेते आहेत; म्हणून मुंबईचा डबेवाला येणाऱ्या दसऱ्याला शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे.

डबेवाले कामगार दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही. त्यामुळे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला डबेवाले वाजत-गाजत, गुलाल उधळत जातील. मुंबई डबेवाला असोशिएशन उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहे.

मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेची नाळ जोडली गेली आहे; म्हणुन मुंबई डबेवाला असोशिएशन अडचणीच्या काळात उध्दव ठाकरे यांचे सोबत असल्याचे मुंबईच्या डबेवाल्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन ठाकरे विरूध्द शिंदे हा संघर्ष अधिकच उफाळून आला आहे. प्रत्यक्ष मेळाव्यादिवशी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.