Pune ACB News : ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी जात पडताळणी समितीच्या उपायुक्तासह पत्नीविरोधात गुन्हा दाखल । Nitin Dhage News

पुणे : 13 जूलै 2023 : PUNE ACB NEWS : ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नितीन ढगे (Deputy Commissioner of Caste Verification Committee Nitin Dhage) आणि त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Nitin Dhage Latest News)

Pune ACB News, case has been registered against Deputy Commissioner of Caste Verification Committee nitin dhage along with his wife for possessing property in excess of known income, nitin dhage acb news,

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले (DYSP ACB Madhuri Bhosale) यांनी वानवडी पोलिस स्टेशनला याप्रकरणी आज 13 जूलै 2023 रोजी फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, जात पडताळणी समितीचे नितीन ढगे यांचेविरुध्द ला.प्र.वि.पुणे (ACP Pune) यांच्याकडून सन 2021 मध्ये सापळा कारवाई करण्यात आली होती. त्यावरुन वानवडी पो. स्टे. गु.र.नं 366/2021, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अन्वये दिनांक 16/10/2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर  त्यांचे रहाते घराचे घरझडतीमध्ये रक्कम रू 1,28,49,000/- रुपये रोख मिळुन आल्याने त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सन 2021 मध्ये चालु करण्यात आली होती. (Wanwadi Police Station Pune)

उघड चौकशीअंती लोकसेवक नितीन ढगे यांनी रक्कम 1,28,95,150/- (ज्ञात उत्पन्नापेक्षा 47 % जास्त) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. लोकसेवक नितीन ढगे (Nitin Dhage News) यांना त्यांची पत्नी प्रतिभा नितीन ढगे (Pratibha Nitin Dhage) यांनी अपप्रेरणा दिली. तसेच कागदपत्रामध्ये खोटी माहिती भरुन वापरुन शासनाची फसवणुक केली म्हणुन लोकसेवक नितीन ढगे व त्यांची पत्नी प्रतिभा ढगे यांच्याविरुध्द उघड चौकशीअंती  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PUNE ACB Latest News)

या प्रकरणी पुण्यातील  वानवडी पोलीस स्टेशनला गु.र.नं. 340/2023, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 13 (1)(ब), 13(2), भा.दं.वि. क. 109, 420, 467, 468, 471 नुसार तत्कालीन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे नितिन चंद्रकांत ढगे (वय – 41 वर्षे) व त्यांच्या पत्नी प्रतिभा नितीन ढगे (वय 35) रा. स.नं.71, सीएसटी नं.1436, रहेजा गार्डन्स, लव्हेड ए फ्लॅट नं.502, वानवडी, पुणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर (Pune ACB DYSP Sudam Pachorkar) हे करत आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी नितीन ढगे यांनी 8 लाख रूपयांची लाच मागणी केली होती. त्या प्रकरणात ढगे यांनी तडजोड करून 3 लाखाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजाराची लाच घेताना नितीन ढगे यांना त्यांच्याच निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नितीन ढगे (Nitin Dhage) यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2021 मध्ये सापळा कारवाई केली होती. त्यावरुन वानवडी पो. स्टे. गु.र.नं 366/2021, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अन्वये दिनांक 16/10/2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नितीन ढगे यांच्या घराची झडती घेतली होती. त्यात 1 कोटी 28 लाख 49 हजाराची रोकड मिळुन आली होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नितीन ढगे यांच्या मालमत्तेची 2021 मध्ये उघड चौकशी सुरु केली होती. दि. 13/09/2006 ते दि. 15/10/2021 याकाळात नितीन ढगे यांनी जमवलेल्या संपत्तीचे परिक्षण करण्यात आले.

उघड चौकशीअंती लोकसेवक नितीन ढगे यांनी रक्कम 1,28,95,150/- (ज्ञात उत्पन्नापेक्षा 47 % जास्त) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नितीन ढगे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा ढगे यांच्याविरुध्द 13 जूलै रोजी वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Pune ACB Amol Tambe), अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Ad SP Pune ACB  Shital Janave) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.