जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत पत्रकार सुदाम वराट यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. असे उपक्रम समाजात सातत्याने राबवावेत असे अवाहन जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील (PI Mahesh Patil) यांनी केले.

जामखेड तालुक्यातील साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयातील सहशिक्षक तसेच जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांच्या वाढदिवसानिमित्त साकेश्वर विद्यालयातील गरजू विद्यार्थी तसेच माता पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, प्रा.अरूण वराट, ज्ञानदेव मुरूमकर, केंद्रप्रमुख किसनराव वराट, महादेव वराट, नानासाहेब लहाने, पोलीस हेडकाँन्टेबल पालवे, पोलीस पाटील महादेव वराट, जामखेड मिडिया क्लबचे उपाध्यक्ष अशोक वीर, सहसचिव पप्पू सय्यद, पत्रकार अविनाश बोधले, किरण रेडे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आश्रू सरोदे, राम जावळे, भाऊसाहेब लहाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश पाटील यांनी सांगितले की, मुला-मुलींसाठी चांगला स्पर्श-वाईट स्पर्शाविषयी जागृती करावी. शारिरीक, मानसिक पीडा, लैंगिक शौषण यासारखे प्रसंग मुला-मुलींसोबत घडल्यास त्यांनी भीती न बाळगता याबाबत शिक्षक, पालक, मित्र-मैत्रिणी यांना सांगावे, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच अभ्यास व्यायाम व शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. पालकांचे व शिक्षकांचे अनुकरण केले पाहिजे. जीवनात ज्यांना यश मिळाले आहे त्यांनी शिस्त व वेळेचे पालन केले पाहिजे. तेच पालन विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. भविष्यात चांगले अधिकारी बनायचे आसेल तर विद्यार्थ्यांनी पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकांचा आभ्यास केला पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी सहा मुलांना शालेय गणवेश तर बारा मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेतील सर्व मुलांना जेवन देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी प्रस्तावित केले तर डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, ज्ञानदेव मुरूमकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर यांनी तर आभार अशोक घोलप यांनी मानले.