धक्कादायक: शेततळ्यात आढळले तिघांचे मृतदेह, मृतांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश, जामखेड तालुक्यात उडाली मोठी खळबळ, हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव (Halgaon) येथून बेपत्ता असलेल्या तिघांचे मृतदेह शेततळ्यात ( Three dead bodies found in farm Pond ) आढळून आल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई, मुलगा, व मुलगी अश्या तिघांचा समावेश आहे. ही घटना हळगावमधील एका शेतात उघडकीस आली. आत्महत्या की घातपात याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. (Jamkhed Crime News Today)
हळगावचे पोलिस पाटील सुरेश ढवळे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला याबाबतची खबर कळवली. हळगाव येथील भीमराव महादू पिंपळे यांच्या गट क्रमांक 434 मधील शेततळ्यात 10/07/23 रोजीच्या मिसिंगमधील महिला उमा बबन पाचारणे (वय 32) (Uma Baban Pacharane), अल्पवयीन मुलगा राजवीर बबन पाचारणे (वय 09) (Rajveer Baban Pacharane) आणि मुलगी दिपाली बबन पाचरणे (वय 11) (Deepali Baban Pacharane) या तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. ही घटना 12 जूलै 2023 रोजी दुपारी उघडकीस आली.
शेततळ्यात तीन मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पाण्यात सडल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 12 रोजी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, सदर घटनेतील तिघे मयत 10 जूलै 2023 रोजी बेपत्ता झाले होते. याबाबतची तक्रार 11 जूलै 2023 रोजी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. परंतू 12 जूलै 2023 रोजी तिघा बेपत्तांचे हळगावमधील एका शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना ही आत्महत्या आहे की घातपात आहे ? याचा जामखेड पोलिसांकडून सखोल तपास वेगाने केला जात आहे. या घटनेमुळे हळगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात जामखेड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडे व जामखेड पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, हळगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने हळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात. या दु:खद घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.