अभिमानास्पद ! जामखेडच्या सुजय तनपुरेची आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, भारताला मिळवून दिले सुवर्णपदक | Asia Wrestling Championship 2023

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। जॉर्डनच्या अम्मान शहरात पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत (Asia Wrestling Championship in Amman Jordan 2023) भारताच्या सुजय तनपुरे या कुस्तीगीराने 68 किलो वजन गटांत सुवर्णपदक (gold medal) पटकाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. सुजय तनपुरे (Sujay Nagnath Tanpure india) हा जामखेडच्या शिऊर गावचा रहिवासी आहे. सुजयने जागतिक पातळीवर जामखेडचे नाव उंचावल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.

Proud, Golden performance of Jamkhed's Sujay Tanpure in Asian Wrestling Championship 2023, sujay Tanpure news

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) उत्तर प्रादेशिक केंद्र, सोनीपथच्या बहलगड येथे तदर्थ समितीच्या वतीने जून 2023 मध्ये अंडर-15 आणि 20 आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या चाचणी स्पर्धेतून एकुण 14 जणांची निवड करण्यात आली. यामध्ये जामखेडच्या सुजय नागनाथ तनपुरे (Sujay Nagnath Tanpure Jamkhed) याचा समावेश होता. 12 ते 18 जुलै दरम्यान जॉर्डनच्या अम्मान शहरात आशिया कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जामखेडच्या सुजय तनपुरे याने 68 किलो वजनी गटांत सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडली.(Asia Wrestling Championship 2023 68kg gold medallist Sujay Nagnath Tanpure india)

इराणच्या मल्लाला नमवत सुजयने पटकावले सुवर्णपदक

7 जून रोजी सोनीपत हरियाणा येते एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी पार पडली होती.यावेळी  सुजय नागनाथ तनपुरे याने सहा कुस्त्यांमध्ये विजय मिळवत जॉर्डन या देशात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली होती.

Proud, Golden performance of Jamkhed's Sujay Tanpure in Asian Wrestling Championship 2023, sujay Tanpure news

14 जुलै रोजी जाॅर्डन देशातील अम्मान शहरात पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ तालमीचा मल्ल तथा जामखेड तालुक्यातील शिऊर गावचा सुपुत्र सुजय नागनाथ तनपुरे याने 68 kg वजन गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली. सुजयने पहिली कुस्ती जपानच्या मल्लासोबत केली.यात त्याने 10-0 या फरकाने विजय मिळवला.दुसऱ्या कुस्तीमध्ये कझाकिस्तानच्या मल्लाला 9-6 या फरकाने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर फायनलमध्ये इराणच्या मल्लासोबत सुजयची लढत झाली. या लढतीत सुजयने 9-5 अशा फरकाने विजय मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

Proud, Golden performance of Jamkhed's Sujay Tanpure in Asian Wrestling Championship 2023, sujay Tanpure news

पुणे विमानतळावर सुजयचे जंगी स्वागत

एशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुजय तनपुरे याचे आज पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी सुजयचे जंगी स्वागत करण्यात आले. सुजयचे वडिल नागनाथ तनपुरे, आई स्वाती तनपुरे, बहीण पूजा तनपुरे, भाऊ विकास नागनाथ तनपुरे, ट्रिपल महाराष्ट्रात केसरी तथा पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष वस्ताद बबनकाका काशिद, उप महाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे, जामखेड बाजार समितीचे संचालक गौतम उतेकर, युवा उद्योजक गोकुळ म्हेत्रे, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचे मार्गदर्शक वस्ताद पंकज भाऊ हरपुडे, भैरवनाथ तालीम संघाचे वस्ताद विठ्ठल देवकाते, शिऊरचे माजी सरपंच सोमीनाथ तनपुरे, माजी पंचायत समिती सदस्य बबन देवकाते, सुभेदार अंकुश तनपुरे, वस्ताद मारुती गाडे, उपसरपंच भाऊसाहेब तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य नरेंद्र पाचारे, महेश्वर केसरी पैलवान गणेश तनपुरे,काशिनाथ ओमासे सह आदी मान्यवर व शिऊर गावचे ग्रामस्थ, मामासाहेब मोहोळ तालीम संघातील पैलवान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Proud, Golden performance of Jamkhed's Sujay Tanpure in Asian Wrestling Championship 2023, sujay Tanpure news

कोण आहे सुजय तनपुरे ?

सुजय तनपुरे हा जामखेड तालुक्यातील शिऊर गावचा रहिवासी आहे. सुजयचे वडिल नागनाथ तनपुरे हे शेतकरी असून त्यांचे गावात छोटेसे हाॅटेल आहे.आई स्वाती तनपुरे ह्या शेती करतात तर भाऊ विकास हा व्यावसायिक आहे. तर बहिण पुजा ही डी फॉर्म झालेली आहे.सुजय याला लहानपणापासून कुस्तीची आवड होती.शिऊरच्या भैरवनाथ तालमीत वस्ताद विठ्ठल देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कुस्तीचे धडे गिरवले. गावातील तालमीत कुस्तीचे चांगले कौशल्य मिळवल्यानंतर सुजय हा पुणे येथील मामासाहेब मोहोळ तालमीत सरावासाठी दाखल झाला आहे. येथे तो वस्ताद पंकज हरपुडे व वस्ताद महेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली 2020 पासून सराव करत आहे.

Proud, Golden performance of Jamkhed's Sujay Tanpure in Asian Wrestling Championship 2023, sujay Tanpure news

पुण्यात घेतलेल्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे सुजयने अनेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विविध पदके पटकावली आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुजय ने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जामखेड सारख्या दुष्काळी भागाची मान अभिमानाने उंचावण्याचे कामगिरी केल्याबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

सुजय तनपुरेची आजवरची कामगिरी

सुजय तनपुरे याने 2022 मध्ये रोहतक येथे पार पडलेल्या फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच उत्तर प्रदेश गोंडा येथे पार पडलेल्या ग्रँड पिक्स नॅशनल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.आता 14 जुलै रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत सुजयने 68 kg वजन गटात त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

Proud, Golden performance of Jamkhed's Sujay Tanpure in Asian Wrestling Championship 2023, sujay Tanpure news

आता लक्ष्य राष्ट्रकुल व ऑलिंपिक स्पर्धेचे

सुजय तनपुरे हा जामखेडचा मल्ल विविध कुस्ती स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. सुजय पुण्याच्या मामासाहेब मोहोळ तालमीत कठोर सराव करत आहे. सुजय काही कमी पडू नये यासाठी त्याचे कुटूंबिय मोठी मेहनत घेत आहेत. सुजयने नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने मिळवलेले हे यश त्याच्या कुटुंबियांनी आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांच्या कष्टाचं चीज करणारं ठरलं आहे. आता राष्ट्रकुल व ऑलिंपिक या मोठ्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे, त्यासाठी माझा यापुढचा प्रवास असणार आहे असे सुजय अभिमानाने सांगतो.

Proud, Golden performance of Jamkhed's Sujay Tanpure in Asian Wrestling Championship 2023, sujay Tanpure news

सुजयला हवी मोठी मदत

सुजय तनपुरे हा जामखेड सारख्या दुष्काळी तालुक्यातील खेळाडू आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुजयची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. सुजय हा कुस्ती या खेळात सध्या चमकदार कामगिरी करत आहे. त्याला देशाकडून खेळून आणखीन अनेक सुवर्णपदके देशाला मिळवून द्यायचे आहेत. यासाठी समाजातील दानशुरांसह त्याला राजाश्रयाची  आवश्यकता आहे. कुस्ती खेळासाठी आवश्यक असलेला खुराक हा महागडा असतो. सुजय सारख्या प्रतिभावान खेळाडूला सर्वांनी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. यातून जामखेडचे नाव तो मोठे करेलच शिवाय तो देशासाठी खेळून देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल यासाठी सर्वांनीच त्याला आशिर्वाद देण्याची आवश्यकता आहे.