अहमदनगर : अंकुश चत्तर हत्या प्रकरणात आणखीन दोघांना अटक, अटकेतील आरोपींची संख्या झाली सात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | Ankush Chattar Murder Case

अहमदनगर : Ankush Chattar Murder Case : अहमदनगर शहरातील सावेडी येथील अंकुश चत्तर यांच्या हत्येप्रकरणी नगरसेवक स्वप्निल शिंदेंसह (Nagarsevak Swapnil Shinde) पाच जणांना अटक केल्यानंतर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Ahmednagar LCB) पथकाने आणखीन दोघा मारेकऱ्यांचा मुसक्या आवळण्याची धडक कारवाई केली आहे. (Two more arrested in Ankush Chattar murder case) अंकुश चत्तर खून प्रकरणातील एकुण अटक आरोपींच्या संख्या आता सात झाली आहे. इतर फरार मारेकऱ्यांचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत. (Ankush Chattar Latest News)

Ahmednagar Breaking Two more arrested in Ankush Chattar murder case,  number of arrested accused has increased to seven, Ahmednagar local crime branch action, Ankush Chattar latest news,

अहमदनगर शहरातील सावेडी परिसरातील कार्यकर्ते अंकुश चत्तर (Ankush Chattar Ahmednagar) यांच्यावर नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्या गँगने जुन्या वादातून  प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. 10 ते 15 जणांच्या टोळक्याने लोखंडी राॅडने चत्तर यांच्या डोक्यावर घाव घालत त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. ही थरारक घटना अहमदनगरमधील एकवीरा चौकात शनिवारी रात्री घडली होती. जखमी अंकुश दत्तात्रय चत्तर ( वय 35, रा पद्मानगर, सावेडी ) यांच्यावर उपचार सुरू होते. परंतू  दुर्दैवाने या घटनेत चत्तर यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. सोमवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.अंकुश चत्तर यांची नगरसेवकाच्या गँगने हत्या केल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे.

अंकुश चत्तर यांची हत्या करणाऱ्या सात मारेकऱ्यांना अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक स्वप्नील शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके, महेश नारायण कुऱ्हे, मिक्या ऊर्फ सुरज राजन कांबळे, अभिजित रमेश बुलाखे (सर्व राहणार अहमदनगर) या पाच जणांच्या एलसीबीने विदर्भातून मुसक्या आवळल्या आहेत. तर आणखीन दोघांना एलसीलबीने जुन्नर येथून अटक केली आहे. यामध्ये मिथून सुनिल धोत्रे वय 23 व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

302 सह विविध कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

मयत अंकुश चत्तर यांचे दाजी बाळासाहेब सोमवंशी यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तोफखाना पोलिस स्टेशनला आरोपींविरुद्ध कलम 307, 323, 324, 325, 327, 143, 147, 148, 149, 108 सह आर्मएक्ट 3/25, म.पो.का.क 37 (1) (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींविरुद्ध 302 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

सात मारेकऱ्यांना वाशिम व जुन्नरमधून अटक

गुन्हे शाखेच्या पथकाला सीसीटीव्ही फुटेच तपासताना काळ्या रंगाची कार नगर, शेवगाव, पैठण, बीडकीन मार्गे वाशिमकडे जाताना दिसली. पथकाने वाशिम येथे जावून आरोपींचा शोध घेतला तेथे हॉटेल गुलाटीच्या बाहेर ती काळ्या रंगाची कार दिसली. कारबाबत हॉटेलमध्ये चौकशी केली असता कारमधील काही व्यक्ती हॉटेलमध्ये राहण्यास आहेत, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने काही जणांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे नाव स्वप्निल शिंदे, अक्षय हाके, अभिजित बुलाख, महेश कुर्‍हे, सूरज कांबळे अशी असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या दुसर्‍या पथकाने रांजणी बेल्हे (ता. जुन्नर) येथून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यामधील एकजण अल्पवयीन असून दुसर्‍याचे नाव मिथून धोत्रे असे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

शनिवारी रात्री 10: 15 वाजता अहमदनगर शहरातील एकवीरा चौकात लहान मुलांच्या दोन गटांत वाद उफाळून आला होता. यातील आदित्य गणेश औटी या तरूणाने सदर वाद सोडवण्यासाठी अंकुश चत्तर यांना फोन करून बोलावून घेतले होते. अंकुश चत्तर व चंदन ढवण यांनी सदरचा वाद सोडवला. त्यानंतर ते दोघे तेथून जात असताना राज फुलारी या तरूणाने त्यांना रोखले. त्याचवेळी दोन काळ्या रंगाच्या देवास नाव लिहिलेल्या गाड्या तेथे आल्या. या गाड्यांमधून नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे व इतर ७ ते ८ जण उतरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे होते. महेश कुऱ्हे याच्या हातामध्ये बंदुक होती. ते सर्वजण अंकुश चत्तर यांच्याजवळ आले व तू स्वप्निल भाऊंचे नादी लागतोस काय? तुला स्वप्निलभाऊ काय आहे ते दाखवतो असे म्हणत सुरज उर्फ मिक्या कांबळे याने लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी इतरांनी चत्तर यांना मारण्यास सुरुवात केली. नगरसेवक स्वप्निल शिंदे हा याला संपवून टाका रे असे म्हणत चत्तर यांच्यादिशेने धावत आला. ते पाहून चत्तर हे सिटी प्राईट हॉटेलच्या दिशेने पळू लागले. त्यावेळी इतर आरोपी चत्तर यांच्या मागे पळत त्यांना मारत होते. चत्तर यांच्या डोक्यात मार लागल्याने ते रस्त्यावर पडले. त्यावेळी सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, महेश कुऱ्हे हे हातातील रॉडने चत्तर यांच्या डोक्यावर घाव घालत होते. तर याला संपवून टाका रे असे अभिजीत बुलाखे सांगत होता. तोही पळत येऊन चत्तर यांच्या डोक्यावर रॉडने घाव घालू लागला. त्याचवेळी स्वप्निल शिंदे तेथे आला व हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवुन टाका व चला लवकर असे म्हणाला व सर्वजण गाडीत बसून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

कारवाईच्या पथकात यांचा होता समावेश

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरुन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. सपोनि गणेश वारुळे, हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोना रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोंढे, भीमराव खर्से, बाळू खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्‍वास बेरड, देवेंद्र शेलार, विशाल दळवी, संदीप दरंदले, फुरकान शेख, विशाल गवांदे, रोहित येमूल, रवींद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.