मोठी बातमी : विद्यार्थीनीकडून लाच घेताना प्राचार्या अडकली एसीबीच्या जाळ्यात; शिक्षण क्षेत्रात उडाली मोठी खळबळ | Bhandara Acb Trap news today

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक घटना विदर्भातून समोर आली आहे. या घटनेत भंडारा जिल्ह्यातील महिला अध्यापक विद्यालयाची (Mahila Adhyapak Vidyalay Bhandara) प्राचार्या लाचखोरीच्या प्रकरणात अडकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर महिला प्राचार्या ही आपल्याच विद्यालयातील विद्यार्थीनीकडे लाच मागत होती. भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bhandara ACB NEWS) प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 17 रोजी करण्यात आली. (JayaPrabha Marbate, principal of Bhandara Mahila Adhyapak Vidyalay was caught in ACB net)

JayaPrabha Marbate, principal of Bhandara's Mahila Adhyapak Vidyalay was caught in ACB's net, asking Students for bribes, there was lot of excitement in  education sector, Bhandara Acb Trap news today,

भंडारा येथील महिला अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका 30 वर्षीय विद्यार्थीनीला विद्यालयाची प्राचार्य जयप्रभा मारबते (Principal Jayaprabha Marbate) (वय 57 ) रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड, भंडारा यांनी 20 जूलै पासून सूरू होणाऱ्या D.EL.Ed प्रथम वर्षाच्या परीक्षेस बसण्यासाठीचे हॉल तिकिट देण्याच्या मोबदल्यात एक हजार रूपयांची तर विकास निधी व गैरहजरीचे 440/- रुपये असे एकूण 1440/-  रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती. सदर लाच खाजगी व्यक्ती अक्षय तुलाराम मोहनकर, (Akshay Tularam Mohankar) वय -27 वर्षे, रा. मौलाना आझाद वार्ड, तुकडोजी पुतळ्याजवळ, भंडारा याच्याकडे देण्यास सांगितले होते. सदर विद्यार्थिनीने याबाबतची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.(Bhandara ACB Trap today)

त्यानुसार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 जूलै 2023 रोजी सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली. यामध्ये प्राचार्य जयप्रभा मारबते यांनी पंचांसमक्ष 1000/- रुपये विकास निधी व गैरहजरीचे 440/- रुपये असे एकूण 1440/-  रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.

त्यानुसार 17 जूलै 2023 रोजी सापळा कारवाई करण्यात आली. सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष प्राचार्य जयप्रभा मारबते यांनी लाच रक्कम खाजगी इसम अक्षय मोहनकर यास देण्यास सांगितले. त्यावरून खाजगी इसम अक्षय मोहनकर यांने पंचा समक्ष प्राचार्य जयप्रभा मारबते यांच्या सांगण्यावरून लाच रक्कम स्विकारताना एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. प्राचार्य जयप्रभा मारबते व अक्षय मोहनकर यास दोघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्ध भंडारा शहर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर परिक्षेत्र पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर व अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोउपनि संजय कुंजरकर, पो ना अतुल मेश्राम, पोलीस अंमलदार चेतन पोटे, पो शि मयूर शिंगणजुडे, पो शि विवेक रणदिवे,पो शि राजकुमार लेंडे, पो शि अंकुश गाढवे,म पो शि अभिलाषा गजभिये, यांचा समावेश होता.

सापळा कारवाई

▶️ घटक :- भंडारा

▶️ तक्रारदार :- महिला, वय  30 वर्षे, रा. भंडारा,  जिल्हा भंडारा व्यवसाय- विद्यार्थी

▶️ आरोपी  लोकसेवक :-
1) श्रीमती जयप्रभा मारबते , वय 57  वर्ष, पद – प्राचार्य, महिला अध्यापक विद्यालय,भंडारा.
रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड, भंडारा.

2) खाजगी इसम – अक्षय तुलाराम  मोहनकर, वय -27 वर्षे, रा. मौलाना आझाद वार्ड, तुकडोजी पुतळ्याजवळ,
भंडारा.

▶️ लाच मागणी रक्कम :-  १,०००/- रुपये

▶️ पडताळणी कार्यवाही :- दि. १५/०७/२०२३ रोजी

▶️ सापळा कार्यवाही :- दि. १७/०७/२०२३

▶️ कारण :-  यातील तक्रारदार या महिला अध्यापक विद्यालय येथे प्रथम वर्ष D.EL.Ed चे शिक्षण घेत असून दिनांक २०/०७/२०२३ रोजी पासून सुरु होणाऱ्या D.EL.Ed प्रथम वर्षाच्या परीक्षेस बसण्यासाठीचे हॉल तिकिट देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्र. 1 यांनी तक्रारदार यांना 1000/- रुपयांची मागणी केली असल्याचे तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून पडताळणी कारवाई दरम्यान पंचांसमक्ष आलोसे क्र.1 यांनी 1000/- रुपये विकास निधी व गैरहजरीचे 440/- रुपये असे एकूण 1440/-  रुपये लाच रक्कमेची पंचासमक्ष मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यावरून सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष आलोसे क्र.1 यांनी लाच रक्कम खाजगी इसम आरोपी क्र.2 अक्षय मोहनकर  यास देण्यास सांगितले. त्यावरून खाजगी इसम आरोपी क्र.2  यांनी पंचा समक्ष आलोसे क्र. 1 यांचे सांगण्यावरून लाच रक्कम स्विकारली असून दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ मार्गदर्शन : मा.श्री. राहुल माकणीकर सर , पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन कदम, ला प्र वि नागपूर

▶️ तपासी अधिकारी : पोलीस उपअधीक्षक डॉ अरुणकुमार लोहार , ला.प्र.वि. भंडारा.

▶️ सापळा कारवाई पथक :- डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोउपनि संजय कुंजरकर,पो ना अतुल मेश्राम, पोलीस अंमलदार चेतन पोटे, पो शि मयूर शिंगणजुडे, पो शि विवेक रणदिवे,पो शि राजकुमार लेंडे, पो शि अंकुश गाढवे,म पो शि अभिलाषा गजभिये, सर्व ला.प्र.वि. भंडारा.

▶️ हैश वैल्यू घेण्यात आली आहे.                 
==================
भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, भंडारा
दुरध्वनी  07184-252661
पोलीस उप अधीक्षक डॉ अरुणकुमार लोहार
मो.क्र.- 9870376706
पोलीस निरीक्षक श्री. अमित डहारे, मोबाईल नं. 09823240129 पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के मोबाईल नंबर 9422644538

@ टोल फ्रि क्रं. 1064