मान्सूनपूर्व पाऊस : राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (pre monsoon rain) थैमान घातले आहे. अनेक भागात वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.आज शनिवारी दि 21 मे रोजी राज्यात पावसाने उसंत घेतली. परंतू राज्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती आहे त्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Pre-monsoon rains, Chance of torrential rains in area of ​​the Maharashtra state, meteorological department issues alert)

मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर (kolhapur, sangli, solapur) जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) झोडपून काढले होते. हवामान खात्याकडून पुन्हा (imd alert) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गोवा, कर्नाटक आणि लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्राच्या अरबी समुद्र किनाऱ्यावर तसेच केरळ घाट परिसरात मोठे ढग साचून आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. (weather forecast) याचबरोबर मान्सूनची वाटचाल बरोबर चालू असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत केरळच्या सीमेवर येण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे.

मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर २२ मे ऐवजी १५ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत 5 ते 6 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

अशात हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे २० ते २१ मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे.

यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. राज्यात हवामान विभागाने (imd alert) दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.(kolhapur, sangli satara heavy rainfall)

दरम्यान मान्सून पूर्व पावसाने (Pre-monsoon rains) अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची (farmer) ऐनवेळी मोठी धावपळ झाली आहे. शेतीची मशागतीची कामे जिथल्या तिथे थांबली तर उन्हाळी सोयाबीन, केळी, द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेच्या लाटेपासुन नागरिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र राज्यातील अजूनही काही भागांमध्ये उन्हाचा उडाका कायम आहे. राज्यात आगामी काही दिवसांत मान्सून पूर्व पाऊस झाल्यास उकाड्यापासून सुटका होण्यास मदत होईल.

दरम्यान 21 मे रोजी कोकण, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळचा काही भाग ढगाळ असुन या भागात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, तर मुंबई पुणे ठाणे या भागातील आकाश निरभ्र असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.