Pune police Vaibhav Shinde Suicide case : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय ?

पुणे, 7 जूलै 2023 : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या वैभव शिंदे या पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्याच्या लोहगावमधून समोर आलीय.

Pune police Vaibhav Shinde Suicide case, Suicide of police constable Vaibhav Shinde, who was preparing for post of police sub-inspector, what is in  suicide note?, Vaibhav shinde latest news,

मयत पोलिस शिपाई वैभव शिंदे हे पोलिस दलाच्या मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. येथे कार्यरत असतानाच ते पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत होते. शिंदे यांनी चिंचेच्या झाडाच्या फांदीला टाॅवेलच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये ?

वैभव शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, पत्नी कांचन मला माफ कर,भाऊ आणि आई मला माफ करा..माझी शेवटची इच्छा पुर्ण करा..भाऊ विजय याने पत्नीशी विवाह करावा, असे शिंदे यांनी चिठ्ठीमध्ये इच्छा व्यक्त केलीय. परंतू मयत वैभव शिंदे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मयत पोलिस शिपाई वैभव शिंदे हे लोहगाव येथील खेरे काॅलनी येथे राहत होते. या ठिकाणी त्यांनी आपल्या घराच्या छतावर आलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या केली. मयत वैभव शिंदे यांच्या मागे, पत्नी कांचन आई, भाऊ विजय, आणि चार वर्षाचा मुलगा आहे.