जामखेड टाइम्स वृत्तसेवा | PMFME Yojana | जामखेड तालुका कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी कृषी प्रक्रिया जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड पंचायत समितीच्या सभागृहामध्ये ही कार्यशाळा पार पडणार आहे, अशी माहिती आत्माचे समन्वयक तुषार गोलेकर यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी कृषी प्रक्रिया जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा जामखेड पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.या कार्यशाळेसाठी जामखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.